विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठानला सांगली जिल्हा नगरवाचनालयाचा ‘आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके’ पुरस्कार घोषित !

सांगली जिल्हा नगर वाचनालय आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. शरद फडके यांच्या आर्थिक सहयोगातून देण्यात येणारा ‘आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके’ पुरस्कार यंदाच्या वर्षी विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान यांना घोषित करण्यात आला आहे.

निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी राज्याचे महिला बालकल्याण आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना २ मास कारावासाची शिक्षा !

ज्यांच्याकडे राज्याच्या २ विभागांचे दायित्व आहे, असे मंत्रीच जर माहिती लपवत असतील, तर अशांकडून पारदर्शक कारभाराची काय अपेक्षा करणार ?

‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यापेक्षा लहान वयात स्वराज्याची शपथ घेणार्‍या छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवा ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

१४ फेब्रुवारी या दिवशी असलेल्या ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी होणारे अपप्रकार थांबावेत, यासाठी प्रबोधनपर ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिक येथे तरुणीने तरुणाला जिवंत जाळले !

प्रेमप्रकरणातून मुलाला मुलीने पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना घडली. मुलीच्या कुटुंबाचाही यात समावेश होता. हा मुलगा ५५ टक्के भाजला आहे.

राजकारण्यांनी लता मंगेशकर यांच्या स्मारकाचा वाद बंद करावा ! – पंडित हृदयनाथ मंगेशकर

पंडित हृदयनाथ मंगेशकर पुढे म्हणाले, ‘‘लता मंगेशकर यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली, ती अवकाशाएवढी मोठी आहे. त्या अवकाशाच्या पोकळीत अनेक गंगा ओतल्या, तरी ती पोकळी भरून निघणार नाही.

पुणे महापालिकेच्या बाहेर गोमूत्र टाकून शुद्धी !

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा पुणे महापालिकेच्या पायर्‍यांवर सत्काराचा कार्यक्रम झाल्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोमूत्र टाकून पायर्‍यांची शुद्धी केली !

(म्हणे) ‘सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांसारख्या कट्टर संस्था समाजासाठी घातक !’

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी प्रतिज्ञापत्रात केंद्रीय अन्वेषण विभागाकडून उल्लेख

राणा अय्युब यांची चोरी !

सामाजिक कार्याच्या नावाखाली पैसे हडपणारे पत्रकार, हा पत्रकारितेला लागलेला कलंकच ! राणा अय्युब यांचा पत्रकारितेच्या नावाखाली असलेला आतंकी बुरखा भारतीय पत्रकारितेने फाडावा !

पेण (जिल्हा रायगड) येथे सह्याद्री प्रतिष्ठान आणि समविचारी संघटना यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात १९० रक्तदात्यांनी केले रक्तदान !

राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढीमधील साठा अल्प पडू लागला आहे. हीच निकड लक्षात घेता पेण येथील शिवप्रेमी आणि सामाजिक संघटना यांच्यावतीने पेण येथील गांधी मंदिर वाचनालयाच्या सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

अवैध सावकारीमुळे पुणे येथील महिलेवर आलेली भीक मागण्याची वेळ टळली !

दिलीप वाघमारे या सावकाराने ४० सहस्र रुपये कर्जाच्या बदल्यात या वयोवृद्ध महिलेकडून अनुमाने ८ लाख रुपये उकळले. त्याच्यावर अवैध सावकारीचा गुन्हा नोंद करून खडक पोलिसांनी त्याला कह्यात घेतले आहे.