बीड जिल्ह्यात मोर्चा, आंदोलने यांवर बंदी आदेश लागू !

जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहाण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

स्पर्धा परीक्षेची सिद्धता करणार्‍या युवकाला मारहाण करून चुन्याच्या निवळीत टाकले  !

धायगुडे अकॅडमीतील ७-८ विद्यार्थी समाधान मोरे यांच्यासह लोणार गल्लीत वास्तव्यास आहेत. तेथे नितीन सोडमिसे नावाचा युवक त्याच्या मित्रांसह आला. त्याने मद्यप्राशन केले होते. सोडमिसे आणि त्याचे सहकारी यांनी मोरे यांना मारहाण करत चुन्याच्या निवळीत ढकलून दिले.

१३ फेब्रुवारीला मिरज येथे कृष्णा-वेणी उत्सव सोहळा आणि कृष्णा नदीची महाआरती !

प्रथम सकाळी ९ वाजता ब्राह्मणपुरी येथील श्री अंबाबाई मंदिर येथून श्री दत्त मंदिर, कृष्णा घाट, श्री मार्कडेंश्वर मंदिर अशी पालखी काढण्यात येणार आहे. यानंतर सकाळी १०.३० वाजता श्री कृष्णा वेणी मूर्ती प्रतिष्ठापना होईल.

सातारा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयासमोर २ गटांमध्ये हाणामारी !

विशेष म्हणजे २०० मीटर अंतरावरच निर्भया पथकाचे पोलीस ठाणे आहे; तरीही याविषयी पोलिसांना तत्परतेने काहीच कळले नाही.

‘दैवी’ आवाज !

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी या दिवशी निधन झाले. लताताईंचा ‘दैवी’ आवाज हीच त्यांची ओळख होती. याठिकाणी ‘दैवी’ हा शब्द महत्त्वाचा आहे. त्यांच्या आवाजाचे वर्णन करतांना अनेक जण ‘लतादीदींचा आवाज ‘दैवी’ आहे’, ..

हिंदुद्वेषी धर्मांध पत्रकारांची गुन्हेगारी वृत्ती जाणा !

अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन पोस्ट’ दैनिकाच्या पत्रकार राणा अय्यूब यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी कारवाई करून त्यांची भारतातील १ कोटी ७७ लाख रुपयांची रक्कम गोठवली.

गलेलठ्ठ पगार घेणार्‍या लोकप्रतिनिधींच्या फलनिष्पत्तीचाही विचार व्हावा !

खासदारांना गलेलठ्ठ वेतन मिळते, हे आपण बघितले; मात्र त्यांच्या आर्थिक संपन्नतेच्या दृष्टीने विचार केल्यास या वेतनाची किती खासदारांना खरोखरच आवश्यकता आहे, याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे.

गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणीपूर आणि पंजाब या ५ राज्यांत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने…

भारतातील लज्जास्पद लोकशाही ! ही आहे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला साधना न शिकवता गुंडगिरी शिकवल्याची भेट ! – संपादक    १. गोव्यातील उमेदवारांच्या विरोधात विविध स्वरूपांचे गुन्हे प्रविष्ट ‘अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणे, विनयभंग करणे, महिलेवर अत्याचार करणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे, भ्रष्टाचार करणे, चोरी करणे, धमकी देणे, पोलीस ठाण्यावर आक्रमण करणे, मारहाण करणे, फसवणूक, गुन्हेगारी … Read more

मतदारांनो, हे लक्षात घ्या !

‘भारतियांनो, गेल्या ७४ वर्षांचा भारताचा इतिहास बघता, यापुढेही राज्यकर्ता म्हणून कोणताही राजकीय पक्ष निवडून आला, तरी ‘तो देशासाठी काही करील’, अशी खोटी अपेक्षा करू नका !’

‘गंभीर गुन्हे प्रविष्ट असणार्‍या राजकारण्यांना उमेदवारी देणारे राजकीय पक्षही एक प्रकारे गुन्हेगारच आहेत’, असे सामान्य जनतेला वाटल्यास चूक ते काय ? गोव्यात ५३ उमेदवारांवर गंभीर गुन्हे नोंद

‘गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘असोशिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’च्या (‘एडीआर्’च्या) आणि ‘गोवा इलेक्शन वॉच’ आणि असोसिएट’ विभागाने दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीत उभ्या राहिलेल्या ३०१ पैकी ५३ उमेदवारांवर गंभीर गुन्हे नोंद आहेत