साबण, शॅम्पू, टूथपेस्ट आदी वस्तूंवर शाकाहारी किंवा मांसाहारी उल्लेख करणे अनिवार्य नाही !
‘सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशन’ (सी.डी.एस्.सी.ओ.) या संस्थेने देहली उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून म्हटले आहे की, कॉस्मेटिक वस्तू बनवणार्या आस्थापनांना त्यांच्या उत्पादनांवर मांसाहारी आणि शाकाहारी असा उल्लेख करण्यासाठी बाध्य करता येणार नाही.