सहा जणांचा मृत्यू !
मुंबई – ताडदेव येथील २० मजली कमला इमारतीच्या १८ व्या मजल्यावर सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत १५ जण घायाळ झाले असून, ६ जणांचा मृत्यू झाला आहे. २ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर अतीदक्षता विभागात उपचार चालू आहेत.
अग्नीशमन दलाच्या १३ गाड्यांद्वारे आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर चालू असून आग लागलेल्या ठिकाणी आणखी काही लोक अडकलेले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आग कशामुळे लागली यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दुर्घटनेत घायाळ झालेल्यांना भाटिया रुग्णालयात भरती करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले.