नवी देहली – ‘सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशन’ (सी.डी.एस्.सी.ओ.) या संस्थेने देहली उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून म्हटले आहे की, कॉस्मेटिक वस्तू बनवणार्या आस्थापनांना त्यांच्या उत्पादनांवर मांसाहारी आणि शाकाहारी असा उल्लेख करण्यासाठी बाध्य करता येणार नाही.
१० डिसेंबर २०२१ या दिवशी या संदर्भात सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली होती. त्यानुसार साबण, शॅम्पू, टूथपेस्ट आदी वस्तूंवर मांसाहारी आणि शाकाहारी असल्याचे उल्लेख ऐच्छिक असल्याचे म्हटले होते. त्याविरोधात ‘राम गौ रक्षक दला’कडून देहली उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आल्यानंतर सरकारकडून वरील प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. यावर पुढील सुनावणी ३१ जानेवारी या दिवशी होणार आहे.