आरोग्य विभागाच्या तक्रारीनंतर रुग्णालयातील एकाच कुटुंबातील ४ आधुनिक वैद्यांवर गुन्हा नोंद !

जिल्ह्यातील आर्वी येथील कदम रुग्णालयाच्या परिसरातील भूगर्भातून पोलिसांनी गर्भपाताचे प्रकरण उघडकीस आणले होते. या प्रकरणाच्या अन्वेषणातून विविध खुलासे समोर येत आहेत. ४ दिवस उलटूनही या प्रकरणात आरोग्य विभागाने…

महाविकास आघाडीचे ५७ नगरपंचायतींवर वर्चस्व, तर भाजपकडे २४ नगरपंचायती !

राज्यातील ३२ जिल्ह्यांमधील १०६ नगरपंचायती आणि २ जिल्हा परिषदांमध्ये ४१३ जागांसाठी मतदान झाल्यानंतर ९७ नगरपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. ९ नगरपंचायतींचे निकाल २० जानेवारी या दिवशी घोषित होणार आहेत.

हिंगोली येथे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्याकडून ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा !

काँग्रेसप्रमाणे शिवसेनेने मुसलमानांचे लांगूलचालन करू नये, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

तीर्थक्षेत्र विकासाची कामे कालबद्धरितीने पूर्ण होण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी समन्वय ठेवावा ! – उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे

तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासासाठी, तसेच भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजित आराखड्यानुसार कामांना गती द्यावी.

सांस्कृतिक वारसा जपणार्‍या केंद्राला साहाय्य करणार ! – डॉ. भागवत कराड, केंद्रीय अर्थराज्यमंत्री

भारताचा सांस्कृतिक वारसा जपणार्‍या आणि संभाजीनगरच्या इतिहासाला समृद्ध करणार्‍या केंद्रास साहाय्य करणार आहे, असे आश्वासन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी १७ जानेवारी या दिवशी दिले.

कल्याण येथील श्री मलंगगडावर श्री मलंगनाथांच्या जयघोषात शाकंभरी पौर्णिमा साजरी !

१७ जानेवारी या दिवशी शाकंभरी पौर्णिमा उत्सवानिमित्त कल्याणमधील श्री स्वामी समर्थ मठाचे धारकरी आणि मठाचे मठाधिश्वर पू. मोडक महाराज यांनी मलंगगडावर प्रदक्षिणा घालत श्री मलंगनाथांचा जयघोष केला.

लोहगड (जिल्हा पुणे) येथे अवैधपणे दर्ग्यावर चादर चढवली !

ऐतिहासिक वास्तूंचे इस्लामीकरण करणार्‍यांना आणि त्यांना रोखण्याऐवजी त्यांच्या कारवायांना खतपाणी घालणार्‍या पोलिसांवर अन् पुरातत्व विभागातील संबंधितांवर कठोर कारवाई करा !

अमरावती पोलिसांनी ३४ गोवंशियांचे प्राण वाचवले !

दस्तुर नगर गोरक्षण संस्थेचे श्री. किशोर टवलारे, काळजीवाहक नंदू दिवे, डॉ. सुमित, डॉ. वाघमारे यांनी सर्व गोवंश ट्रकमधून सुरक्षित बाहेर काढून दस्तूरनगर गोरक्षणच्या स्वाधीन केला.

नवी मुंबईत ६० लाख रुपये किमतीचा गुटखा कह्यात, ७ जणांना अटक

राज्यात गुटखाबंदी असतांना गुटखा पकडण्यासाठी मोहीम का राबवावी लागते ? पोलीस त्यापूर्वीच अशा कारवाया का करत नाहीत ?

पुणे शहर पोलीस दलातील ४८० पोलीस कोरोनाबाधित !

पोलीस आयुक्तालय, पोलीस मुख्यालय, अनेक पोलीस ठाणी, विविध पथके यांमधील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता अन् पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी कोरोना चाचणी घेण्यास प्राधान्य दिले होते.