पुणे शहर पोलीस दलातील ४८० पोलीस कोरोनाबाधित !

पुणे – शहर पोलीस दलातील ४८० पोलीस कोरोनाबाधित झाले आहेत. यामध्ये ५० अधिकार्‍यांचा समावेश आहे. पोलीस घरी राहूनच उपचार घेत आहेत. पोलीस आयुक्तालय, पोलीस मुख्यालय, अनेक पोलीस ठाणी, विविध पथके यांमधील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता अन् पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी कोरोना चाचणी घेण्यास प्राधान्य दिले होते.