म्यानमारच्या माजी प्रमुख आंग सांग स्यू की यांना ४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

म्यानमारच्या नेत्या तथा नोबेल पुरस्कार विजेत्या आंग सांग स्यू की यांना एका स्थानिक न्यायालयाने ४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. स्यू की यांना कोरोना नियमांचे उल्लंघन करणे, तसेच भावना भडकावणे, या गुन्ह्यांखाली ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

आडवली गावातील श्री देव रवळनाथ मंदिरातील दानपेटी फोडून चोरी

हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! मंदिरात नुकताच धार्मिक कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. त्यामुळे दानपेटीत रोख रक्कम जमा झालेली होती.

‘उत्तरप्रदेश शिया वक्फ बोर्डा’चे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी स्वीकारला हिंदु धर्म !

‘उत्तरप्रदेश शिया वक्फ बोर्डा’चे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी येथील डासनादेवी मंदिरात जुना आखाड्याचे महामंडलेश्‍वर नरसिंहानंद गिरि सरस्वती यांच्या उपस्थितीत हिंदु धर्मात प्रवेश केला.

काँग्रेसकडे ९ मतदारसंघांत उमेदवारीसाठी एकच नाव आले, तर फोंड्याचे आमदार रवि नाईक यांना सूचीतून वगळले

फोंडा गट काँग्रेस समितीचे अध्यक्ष जॉन परेरा यांच्या मते समितीने फोंडा मतदारसंघासाठी राजेश शेट वेरेकर यांच्या नावाची शिफारस केली आहे.

विशेष तज्ञ असल्याचा दावा केल्याच्या प्रकरणी डॉक्टरला ५० सहस्र रुपयांचा दंड आणि ३ मास निलंबन

राज्यातील एका एम्.बी.बी.एस्. डॉक्टरला तो विशेष तज्ञ नसतांना त्याने तसा दावा केल्याने त्याला ‘आंध्रप्रदेश मेडिकल कौन्सिल’ने ५० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला ,तसेच ३ मासांसाठी निलंबित केलेे.

साळगाव (गोवा) मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांचे बंड !

‘टुगेदर फॉर साळगाव’ या शीर्षकाखाली भाजपच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय !

भाजप सत्तेत असतांना तीन तलाकवर कायदा होऊ शकतो; मग मथुरा आणि काशी यांच्यासाठीही व्हायला हवा ! – डॉ. प्रवीण तोगाडिया

उत्तरप्रदेशमध्ये भाजप सत्तेत आहे. देशात तीन तलाकच्या संदर्भात कायदा संमत करण्यात आला. तसाच कायदा मथुरा आणि काशी येथील मंदिरांसाठीही करायला हवा. देश तोडणार्‍या आणि मंदिरे पाडणार्‍या जिहादींना कठोर शिक्षा व्हायला हवी.

दैनिक ‘सनातन प्रभात’ असे सर्वांचा आधार !

भीषण कलियुगात दिला परात्पर गुरुदेवांनी साधकांना ‘सनातन प्रभात’रूपी प्रसाद ।
म्हणूनच ते आहे साधक, हितचिंतक आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा आधार ।। १ ।।

दैनिक ‘सनातन प्रभात’ म्हणजे साधकांना साधनेच्या पुढच्या टप्प्यांवर नेणारे गुरूंचे निर्गुण रूपच !

‘हे गुरुदेवा, आम्हा सर्व साधकांना सनातन प्रभातच्या वाचकांना साधनेत जोडून ठेवता येऊ दे. हे दैनिक योग्य जिज्ञासूंपर्यंत पोचले जाऊन ते वर्गणीदार होऊ देत आणि लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची पहाट होऊ दे’, अशी तुझ्या कोमल चरणी प्रार्थना करते.

देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गोमंतकियांना भुरळ पाडणारी आश्‍वासने

जनता कर भरते आणि राजकारणी विविध आमिषे देऊन त्याच पैशांतून सुविधा देण्याचे घोषित करून स्वतः सत्तेत येण्याचा प्रयत्न करतात. देशात अतोनात समस्या असतांना अशा विनामूल्य सुविधा देऊन जनतेला ऐतखाऊ बनवणे कितपत योग्य ?