‘सनातन प्रभात’च्या ज्ञानशक्तीचा परिपूर्ण लाभ घ्या !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पश्चिम महाराष्ट्र आवृत्तीच्या वर्धापनदिनानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश

‘आर्थिक लाभ होत असेल, तर गोवा राज्य ही कॅसिनोची राजधानी घोषित करू !’

या वक्तव्याचे समाजात उमटले तीव्र पडसाद ! गोवा ही परशुरामभूमी आणि मंदिरांची भूमी आहे. पर्यटनाच्या नावाने गोव्याला भोगभूमी करणे जनतेला अपेक्षित नाही !

मराठीला वाचवायचे असेल, तर आपण स्‍वत: मराठीत बोलायला हवे ! – नरेंद्र चपळगावर, निवृत्त न्‍यायमूर्ती

‘‘मराठीला ज्ञानभाषा करायची आहे, असे आपण म्‍हणतो; परंतु दुसरीकडे मराठी शाळा बंद पडत आहेत. मराठी मुले इंग्रजी शाळांकडे आकर्षित होत आहेत; कारण सरकार आणि पालक दोघेही मराठी शाळांना पाठिंबा देत नाहीत.

मराठी भाषेला वैभव प्राप्‍त करून देण्‍यासाठी शासनाने प्रयत्न करावेत ! – शरद पवार, राष्‍ट्रीय अध्‍यक्ष, राष्‍ट्रवादी काँग्रेस

अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या समारोपाच्‍या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्‍हणून ते उपस्‍थित होते. स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान नाशिककर आणि महाराष्‍ट्र कधीही विसरू शकणार नाही, असे शरद पवार म्‍हणाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाळूची वाहतूक करणार्‍या होड्यांची नोंदणी करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील सर्व खाडीपात्रांच्या पहाणीच्या वेळी नोंदणीकृत नसलेली होडी आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रादेशिक बंदर अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, वेंगुर्ला यांनी कळवले आहे. 

‘गोवा सरस २०२१’ या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मंत्री मायकल लोबो दोघेही अनुपस्थित

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि ग्रामीण विकास संस्थेचे मंत्री मायकल लोबो उद्घाटन समारंभाला उपस्थिती लावतील म्हणून आयोजकांनी सुमारे दीड घंटा त्यांची वाट पाहिली आणि त्यानंतर उद्घाटन समारंभ पुढे ढकलून तो दुपारी ४ वाजता करण्यात आला.

अपघातस्थळी पोचण्यास विलंब झाल्याने ३ पोलीस हवालदार सेवेतून निलंबित

जेव्हा जनता अपघातस्थळी पोलीस वेळेत न पोचल्याची तक्रार करते, तेव्हा अशी कारवाई कधी पोलिसांवर केली जाते का ? तशी होणे अपेक्षित आहे, तरच पोलिसांना वेळेत पोचायची सवय लागेल !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘मतदारांकडे मतांची भीक मागावी लागते, हे उमेदवारांना लज्जास्पद ! त्यांनी निवडून आल्यावर मतदारांसाठी काही केले असते, तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप !

समारोपाच्या कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.