भाजप सत्तेत असतांना तीन तलाकवर कायदा होऊ शकतो; मग मथुरा आणि काशी यांच्यासाठीही व्हायला हवा ! – डॉ. प्रवीण तोगाडिया

आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया

जौनपूर (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशमध्ये भाजप सत्तेत आहे. देशात तीन तलाकच्या संदर्भात कायदा संमत करण्यात आला. तसाच कायदा मथुरा आणि काशी येथील मंदिरांसाठीही करायला हवा. देश तोडणार्‍या आणि मंदिरे पाडणार्‍या जिहादींना कठोर शिक्षा व्हायला हवी. त्यांना नामशेष करायला हवे. असे केल्यास भाजपला आगामी उत्तरप्रदेश निवडणुकीत त्याचा लाभ होईल, असे मत आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी येथे केले. येथील शारदा शक्तिपीठाचे दर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

डॉ. तोगाडिया पुढे म्हणाले की,

१. हिंदूंच्या मोठ्या संघर्षानंतर अयोध्येत आता श्रीराममंदिर उभे रहात आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. हे पाहून समाधान मिळत आहे.

२. श्रीराममंदिर निर्माण करण्यासाठी जसे अभियान राबवण्यात आले, तसेच आता गरिबी मुक्त भारतसाठी विशेष अभियान राबवणे आवश्यक आहे. श्रीराममंदिर आंदोलन चालू झाले, तेव्हा मी काही गोष्टी समोर ठेवल्या होत्या. प्रत्येक हिंदूला अन्न, स्वस्त आणि चांगले शिक्षण, युवकांना रोजगार, शेतकर्‍यांना त्यांची उत्पादने अन् पिके यांना चांगला भाव मिळायला हवा, असा प्रस्ताव मांडला होता.