दैनिक ‘सनातन प्रभात’ असे सर्वांचा आधार !

वैद्या (कु.) माया पाटील

भीषण कलियुगात दिला परात्पर गुरुदेवांनी साधकांना ‘सनातन प्रभात’रूपी प्रसाद ।
म्हणूनच ते आहे साधक, हितचिंतक आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा आधार ।। १ ।।

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सिंहाचा वाटा उचलतो ।
हिंदूसंघटन, धर्मजागृती आणि राष्ट्ररक्षण यांचे ध्येय समोर ठेवतो ।। २ ।।

कधीही सुटी न घेता विनामोबदला सेवा करती साधकजन त्याची ।
आश्चर्यचकित होई समाजमनही पाहूनी निरपेक्ष सेवा कलियुगी साधकांची ।। ३ ।।

ईश्वरनिष्ठ ‘सनातन प्रभात’ला असे देवता आणि संत यांचा आशीर्वाद ।
म्हणूनच ‘सनातन प्रभात’ आहे तत्त्वनिष्ठ सर्व प्रसंगांत ।। ४ ।।

महर्षि, परात्पर गुरुदेव (टीप १) आणि संत करती दिशादर्शन ।
चैतन्यदायी ‘सनातन प्रभात’मधून ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचे होते प्रक्षेपण ।। ५ ।।

‘सनातन प्रभात’मधील शिकवणीनुसार आचरण करून वाचकही करती आध्यात्मिक उन्नती ।
हीच आहे ‘सनातन प्रभात’च्या आध्यात्मिकतेची प्रचीती ।। ६ ।।

आम्हा साधकांचे ‘सनातन प्रभात’ला साष्टांग नमन ।
सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करवून घ्या, हीच प्रार्थना परात्पर गुरुदेवांच्या चरणी मनोमन ।। ७ ।।

(टीप १ – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले)

– वैद्या (कु.) माया पाटील, देवद आश्रम, पनवेल.