‘टुगेदर फॉर साळगाव’ या शीर्षकाखाली भाजपच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय
पणजी, ५ डिसेंबर (वार्ता.) – ‘गोवा फॉरवर्ड’चे साळगाव मतदारसंघाचे आमदार जयेश साळगावकर यांनी आमदारकीचे त्यागपत्र देऊन नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने साळगाव मतदारसंघातील सर्व ‘बूथ’ समित्या विसर्जित केल्या आहेत. भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांना विश्वासात न घेताच हा निर्णय घेतल्याचा आरोप करून साळगाव मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विरोधात बंड पुकारले आहे.
BJP rebels unite under ‘Together for Saligao’ to field ind https://t.co/ntZLC7luBa
— TOI Goa (@TOIGoaNews) December 6, 2021
नाराज कार्यकर्त्यांनी साळगाव मतदारसंघात ५ डिसेंबर या दिवशी एक मेळावा घेऊन ‘टुगेदर फॉर साळगाव’ या शीर्षकाखाली भाजपच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अपक्ष या नात्याने ही निवडणूक लढवण्याचे, तसेच रेईस मागोस पंचायतीचे सरपंच केदार नाईक आणि जिल्हा पंचायत सदस्य रूपेश नाईक हे उमेदवारासाठी दावेदार आहेत, अशी माहिती कार्यकर्त्यांनी मेळावा झाल्यानंतर पत्रकारांना दिली.