आर्यन खान याच्या जामिनावर २७ ऑक्टोबर या दिवशी सुनावणी होणार !

२ आरोपींना जामीन संमत !

आर्यन खान

मुंबई – अमली पदार्थविरोधी पथकाच्या ‘कॉर्डेलिया क्रूझ’वरील कारवाईच्या प्रकरणात २६ ऑक्टोबर या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी आरोपींच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. सुनावणीत एक आरोपी मनीष राजेगरिया आणि अवीन साहू यांना न्यायालयाने जामीन संमत केला. कामकाजाची वेळ संपल्यामुळे आर्यन खान याच्यासह अन्य आरोपींची पुढील सुनावणी २७ ऑक्टोबर या दिवशी होईल.