मुंबईत १४ कोटी रुपयांचे काश्मिरी चरस कह्यात !

४ जणांना अटक 

काश्मिरी चरस

मुंबई – मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दहिसर पडताळणी नाका (चेकनाका) येथे एका गाडीतून २४ किलो काश्मिरी चरस कह्यात घेतले आहे. या चरसचे मूल्य आंतरराष्ट्रीय बाजारात १४ कोटी ४४ रुपये इतके आहे. या प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली असून यात २ पुरुष आणि २ महिला यांचा समावेश आहे.  यातील मुख्य आरोपी बंडू उदमशिळे यालाही पोलिसांनी अटक केली आहे. बंडू उदमशिळे याला वर्ष २०१० मध्येही अटक करण्यात आली होती. हे आरोपी प्रतिमास काश्मीरला जाऊन २५ ते ३० किलो चरस मुंबईत आणत होते.