-
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री किंवा खरेदी करण्यास सक्त बंदी
-
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रदूषण टाळण्यासाठी फटाक्यांचा वापर न करण्याचा सल्ला
कोरोनाच्या अनुषंगाने निर्बंध घालणारी महापालिका फटाक्यांवर बंदीच का घालत नाही ? – संपादक
पणजी, ७ सप्टेंबर (वार्ता.) – कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पणजी महानगरपालिकेने श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने महानगरपालिका क्षेत्रासाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मार्गदर्शक तत्त्वांमधील महत्त्वाची सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.
१. श्री गणेशमूर्तींची विक्री करणार्या सर्व चित्रशाळांमध्ये सामाजिक अंतराचे पालन करावे आणि चित्रशाळेत भाविकांना सामाजिक अंतर पाळता यावे, यासाठी प्रत्येक २ मीटर अंतरावर भूमीवर वर्तुळ रंगवावे. चित्रशाळेतून मूर्ती नेण्यासाठी आणलेल्या वाहनांत केवळ २ व्यक्तीच बसू शकतील.
२. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री किंवा खरेदी करण्यास बंदी आहे. शहरात फटाक्यांची विक्री करण्यासाठी महापालिकेने जागा आरक्षित केलेली आहे आणि या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी दुकाने उघडण्यास अनुमती दिली जाणार नाही.
३. पणजी शहरात माटोळीचे साहित्य विक्री करणार्यांना केवळ ८ ते १० सप्टेंबरपर्यंत ‘रॉयल फूड्स’जवळील नियुक्त केलेल्या ठिकाणी साहित्य विक्री करता येणार आहे.
४. सार्वजनिक गणेशोत्सवात राज्यशासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करूनच कार्यक्रम आयोजित करावे.