आजपासून मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून १६ टन किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या वाहनांना वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ८ ते १० सप्टेंबर, १४ सप्टेंबरला सकाळी ८ ते १५ सप्टेंबरला रात्री ८ वाजेपर्यंत, तसेच १९ सप्टेंबरला सकाळी ८ ते २० सप्टेंबरला रात्री ८ या कालावधीत १६ टन किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या वाहनांना ही बंदी असणार आहे. ८ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या कालावधीत या महामार्गावरून वाळू, रेती वा तत्सम गौण खनिजांची वाहतूक करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणार्‍या वाहनांना हे निर्बंध लागू नाहीत, अशी माहिती जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली.