पुणे जिल्ह्यातील ७९ गावांना ‘झिका’ विषाणूचा संसर्ग !

जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसरमध्ये ‘झिका’ विषाणूचा रुग्ण सापडला आहे. आता बेलसरच्या आजूबाजूच्या ७९ गावांमध्ये या विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे

विद्यापिठाने स्वतःच्या तांत्रिक चुकांचे खापर विद्यार्थ्यांवर फोडले !

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाच्या ‘ऑनलाईन’ परीक्षेतील तांत्रिक गोंधळामुळे ‘बी.ए., बी.कॉम., बी.सी.ए.’, अशा विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देऊनही गुणपत्रिकेमध्ये अनुपस्थित दाखवण्यात आले होते.

यवतमाळ येथे प्रतिदिन १५० पोती स्वस्त धान्य तांदूळ काळ्या बाजारात विकला जातो !

गरिबांसाठी २ रु. प्रतिकिलो येणारा तांदूळ प्रतिदिन १५० पोती इतक्या प्रमाणात काळ्या बाजारात विकला जातो. ‘काल्या’ नावाचा काळाबाजारी संपूर्ण विदर्भात पोलिसांच्या नाेंदीत आहे.

जत शहराच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून देऊ ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पतंगे आणि कार्यकर्ते यांनी नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची भेट घेऊन जत शहराच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याविषयी निवेदन दिले.

ऑक्सिजनची प्रतिदिवसाची आवश्यकता ७०० मेट्रिक टनपर्यंत होईल, त्या वेळी महाराष्ट्रात कडक दळणवळण बंदी लागू होईल ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

कोरोनाची तिसरी लाट आल्यास केंद्रशासनाच्या सूचनेनुसार कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या दीडपट म्हणजे प्रतिदिन ३ सहस्र ८०० इतकी प्रतिदिन ऑक्सिजनची निर्मिती होणे आवश्यक आहे.

जिल्हाधिकार्‍यांशी बोलून प्लास्टिकचे ध्वज विक्री करणार्‍यांचे ध्वज जप्त करण्यासाठी कारवाई करण्याच्या सूचना देऊ ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

हिंदु जनजागृती समितीच्या श्रीमती मधुरा तोफखाने आणि सौ. सुलभा तांबडे यांनी १० ऑगस्ट या दिवशी आमदार श्री. गाडगीळ यांना राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याच्या संदर्भात निवेदन दिले. याच मागणीचे निवेदन भाजपच्या नगरसेविका सौ. उर्मिला बेलवकर यांनाही देण्यात आले.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करा !

हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला निवेदन

प्रामाणिकपणा वाढवा !

प्रशासनाच्या अशा अक्षम्य चुकांमुळे नागरिकांना हाल सोसावे लागतात. एरव्हीच प्रशासकीय स्तरावरील कारभार चोख नसल्यामुळे कर्मचार्‍यांना आपत्काळातही अचूक कृती करता येत नाहीत, हे सिद्ध होत आहे……

संभाजीनगर शहरातील गुंडगिरी वाढल्याने उद्योजकांकडून निषेध; पालकमंत्र्यांना निवेदन देणार !

१०-१२ जणांच्या जमावाने आस्थापनातील अधिकारी आणि कर्मचारी यांना पुष्कळ मारहाण केली.

संभाजीनगर येथे कोरोना प्रतिबंधक लस चोरून तिची विक्री करणार्‍यास अटक !

कोरोनाच्या लसींचा काळाबाजार करणार्‍यांवर कठोर कारवाई केल्याविना असे प्रकार थांबणार नाहीत !