दुचाकीवर टेम्पो घालून २ शिवसैनिकांची हत्या केल्याप्रकरणी ५ संशयितांना कर्नाटकातून अटक !

मोहोळमध्ये विजय सरवदे आणि सतीश क्षीरसागर या शिवसैनिकांची अपघात भासवून हत्या करण्यात आली होती. या शिवसैनिकांच्या दुचाकी वाहनावर टेम्पो घालून अपघात असल्याचे भासवत ही हत्या करण्यात आली होती.

पुणे जिल्ह्यातील ४२ गावे कोरोना संसर्गाचा ‘उच्च धोका’ म्हणून घोषित !

जिल्ह्यातील भोर, वेल्हे आणि पुरंदर या तीन तालुक्यांचा अपवाद वगळता अन्य १० तालुक्यांमधील मिळून ४२ गावांमध्ये कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे.

मुंबईप्रमाणेच विश्वभरात पूरस्थिती निर्माण झाली असून तेथील महापालिका आमच्या नियंत्रणात नाहीत !

महाराष्ट्रात जुलै २०२१ मध्ये पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पावसामुळे मुंबईचीही पुष्कळ हानी झाली होती.

परदेशात नोकरी लावण्याचे आमीष दाखवून फसवणार्‍या आणि वर्ष २००५ पासून पसार असणार्‍या धर्मांध महिलेला अटक !

गुन्हेगारीतही पुढे असलेल्या धर्मांध महिला देशासाठी चिंताजनक ! अशा महिलांना कठोर शिक्षा त्वरित होणे अपेक्षित आहे.

नागपूर येथील मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यावर वैद्यकीय देयकांमध्ये घोटाळा केल्याचा आरोप !

‘मेट्रो’चे जनसंपर्क अधिकारी अखिलेश हळवे यांनी प्रशांत पवार यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले की, वैद्यकीय देयकांमध्ये विविध ‘हेड्स’ असल्याने देयकांचा आकडा अधिक दिसतो.

फुपणी (जिल्हा जळगाव) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण !

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ३० जुलै या दिवशी फुपणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या परिसरात डॉ. कमलाकर पाटील यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

भक्तांद्वारे मंदिराचे उत्कृष्ट व्यवस्थापन पहाणारे शिवशंकर पाटील यांचा आदर्श सर्वच मंदिर विश्वस्तांनी घ्यावा ! – चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त शिवशंकर पाटील यांना सनातन संस्थेकडून श्रद्धांजली !

लोकांचे मनःस्वास्थ्य जपण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर मंदिरे खुली करा ! – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति ट्रस्ट

मंदिरांमध्ये होणारे देवाचे दर्शन, प्रार्थना, धार्मिक वातावरण हे सर्व भाविकांच्या श्रद्धा जपणारे असल्याने लोकांमध्ये असलेली कोरोनाच्या साथीविषयीची भीती दूर व्हायला साहाय्य होईल, तसेच काही आजारांनंतर मानसिक स्थिती असंतुलित होते.

कोल्हापूर, सांगली, सातारा, आणि पुणे या जिल्ह्यांत लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न करणार ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

‘‘कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी कोरोना प्रतिबंध नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. ज्या देशांमध्ये लसीकरण अधिक झाले, तेथे कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा संसर्ग न्यून असल्याचे दिसून येत आहे.

अकोला येथे पीकविम्याच्या प्रश्नावर भाजपचे आमदार सावरकर यांनी विमा आस्थापनांच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले !

अतीवृष्टीमुळे हानी झालेल्या शेतकर्‍यांना हानीभरपाई देण्यास विमा आस्थापनांकडून पंचनामे न घेणे आणि पैसे देण्यास टाळाटाळ करणे, हे आता नित्याचेच झाले आहे.