गुन्हेगारीतही पुढे असलेल्या धर्मांध महिला देशासाठी चिंताजनक ! अशा महिलांना कठोर शिक्षा त्वरित होणे अपेक्षित आहे. – संपादक

पुणे, ५ ऑगस्ट – परदेशात नोकरी लावण्याचे आमीष दाखवून अनेकांची फसवणूक करणार्या आणि वर्ष २००५ पासून पसार असणार्या राहत तालीबअली सय्यद उपाख्य अलका शर्मा या महिलेला विमाननगर (पुणे) येथून अनुमाने १६ वर्षांनी अटक करण्यात आली. ती विमाननगर भागात नाव बदलून रहात होती. तिच्यावर नजर ठेवत विमाननगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. चौकशीत तिने फसवणुकीच्या गुन्ह्यांची स्वीकृती दिली.
वर्ष २००५ मध्ये परदेशात नोकरी लावण्याच्या आमीषाने फसवणूक केल्याप्रकरणी अबिदअली सैय्यद, अब्दुलवहाब मुजावर, राहत सैय्यद यांच्याविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याविषयी ज्ञानेश्वर जमदाडे यांनी तक्रार दिली होती. परदेशात नोकरीच्या आमीषाने जमदाडे, त्यांचे मित्र सुरेश रक्ती यांच्यासह अनेकांची फसवणूक करण्यात आली होती.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
पुणे महापालिकेने १० वर्षांपूर्वी खरेदी केलेले अन्न पडताळणी यंत्र सापडले !
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !