पुणे जिल्ह्यातील ४२ गावे कोरोना संसर्गाचा ‘उच्च धोका’ म्हणून घोषित !

नागरिकांनी आतातरी कोरोना प्रतिबंधक नियमांचे गांभीर्याने पालन करावे ! – संपादक 

पुणे, ५ ऑगस्ट – जिल्ह्यातील भोर, वेल्हे आणि पुरंदर या तीन तालुक्यांचा अपवाद वगळता अन्य १० तालुक्यांमधील मिळून ४२ गावांमध्ये कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने ही गावे ‘हाय रिस्क’ (उच्च धोका) म्हणून घोषित केली आहेत. तेथील कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी कडक उपाययोजनांसमवेतच सर्वेक्षण, कोरोना चाचण्यांवर अधिक भर दिला जाणार आहे. प्रसंगी तेथे कडक दळणवळण बंदी करण्याच्या सूचनाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी येथील सरपंच आणि ग्रामसेवक यांना दिल्या आहेत.