सांगली – जिल्हा नियोजन समितीमधून १ कोटी ३२ लाख रुपयाचा निधी व्यय करून उभारण्यात आलेल्या सांगली येथील शासकीय रुग्णालयातील ‘लिक्विड ऑक्सिजन प्लँट’ चालू झाला आहे. याची क्षमता १३ ‘के.एल्.’ आहे, असे सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले.
सध्या या टँकमध्ये अंदाजे १२ मेट्रिक टन ‘लिक्विड ऑक्सिजन’ भरण्यात आला आहे. शासकीय रुग्णालयासाठी प्रतिदिन अर्धा ते १ मेट्रिक टन इतक्या ऑक्सिजनची आवश्यकता असते. एकदा हा टँक पूर्ण क्षमतेने भरल्यावर हा ऑक्सिजन अंदाजे १७ ते १८ दिवस पुरेल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.