देशाची सर्वच क्षेत्रांत केविलवाणी स्थिती होण्यामागील कारण !

राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी प्रेम नसणार्‍या जनतेला राष्ट्र अन् धर्म यांच्याविषयी प्रेम नसणार्‍या राजकीय पक्षांना निवडून द्यायचा अधिकार दिल्याने देशाची सर्वच क्षेत्रांत केविलवाणी स्थिती झाली आहे !

चुका सांगून साधकांना घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘पूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले अध्यात्म प्रसारासाठी विविध ठिकाणांना भेटी देत असत. एके ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जात असतांना मार्गात येणार्‍या छोट्या-छोट्या गावांतील साधकांना भेटून मार्गदर्शन करीत. त्या वेळी भ्रमणभाषची सुविधा उपलब्ध नसल्याने साधकांना दूरभाषवर निरोप कळवला जायचा आणि त्यानुसार साधक ठराविक ठिकाणी थांबून परात्पर गुरु डॉक्टरांना नियोजित स्थळी घेऊन जायचे.

प्रेमळ, शारीरिक त्रास असूनही तळमळीने साधना आणि सेवा करणार्‍या अन् संतांप्रती भाव असणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पुणे येथील कै. (सौ.) शोभा जोशी !

माघ शुक्ल पक्ष द्वादशी (६.२.२०२०) या दिवशी पुणे येथील साधिका सौ. शोभा जोशी (वय ६३ वर्षे) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पुणे येथील साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनापूर्वी अन् निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

श्री दुर्गादेवीचा जप करत असतांना ध्यानात श्री खंडोबाच्या वेशात परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांच्या समवेत खेडवळ स्त्रियांच्या वेशात श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे दर्शन होणे

मी दुर्गादेवीचा जप करत असतांना ध्यानात ‘मी खंडोबाला चालले आहे’, असे मला दिसले. तिथे ११ पायर्‍यांवर ११ नारळ फोडून मंदिरात जावे लागते. डोंगरावर आणि मंदिरात जात असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ दिसल्या.

सेवेची तळमळ असलेल्या, विठ्ठलाची भक्ती करणार्‍या आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रती अपार भाव असलेल्या सोलापूर येथील साधिका कै. (श्रीमती) ताराबाई व्हनमारे (वय ६० वर्षे) !

सोलापूर येथील सनातनच्या साधिका श्रीमती ताराबाई व्हनमारे (वय ६० वर्षे) यांचे १३.५.२०२१ या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या काही काळ रामनाथी आश्रमात सेवेसाठी आल्या असतांना आश्रमातील साधिकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्रीमती ताराबाई व्हनमारेकाकू यांनी कै. (सौ.) सुजाता देवदत्त कुलकर्णी यांची रुग्णाईत स्थितीत प्रेमाने सेवा करणे

‘व्हनमारेकाकूू वयस्कर असूनही माझी आई रुग्णालयामध्ये असतांना आईच्या समवेत त्या रात्री एकट्या झोपायला असायच्या, तसेच ‘आईचे डायपर (मलमूत्र शोषणारे वस्त्र) पालटणे, तिला औषधे देणे’ इत्यादी सेवा त्या एकट्या करायच्या.

व्यष्टी साधनेचे प्रयत्न तळमळीने करणार्‍या, मनमिळाऊ, प्रेमभाव, सेवेची तळमळ आदी गुण असलेल्या पुणे येथील साधिका कै. (सौ.) सुवर्णा मुळे (वय ६१ वर्षे) !

१०.५.२०२१ या दिवशी पुणे येथील साधिका कै. (सौ.) सुवर्णा मुळे (वय ६१ वर्षे) यांचे दुःखद निधन झाले. त्यांचे कुटुंबीय आणि पुणे येथील सहसाधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.