शहरातील दुकाने उघडण्यास अनुमती द्या ! – पुणे व्यापारी महासंघाची मागणी

(प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे – गेल्या मासापासून शहरातील व्यापार पेठा बंद असल्याने शहरातील व्यापारी आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे ३१ मे नंतर शहरातील दुकाने खुली ठेवण्यास अनुमती द्यावी, अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव पितळीया यांनी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सणासुदीच्या काळात व्यापार बंद असल्याने व्यापारी आणि कर्मचारी वर्गासमोर संकट उभे राहिले आहे. दळणवळण बंदीचा व्यापार क्षेत्राला कोट्यवधी रुपयांचा फटका बसल्याने व्यापार्‍यांची हानी झाल्याचे फत्तेचंद रांका यांनी सांगितले. दळणवळण बंदी अशीच चालू राहिल्यास अनेकांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळण्याची भीती पितळीया यांनी व्यक्त केली.