पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील ‘मॉर्निंग वॉक’ करणारे ३७ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह

(प्रतिनिधिक छायाचित्र)

पिंपरी – कोरोना रुग्णसंख्या अजूनही आटोक्यात आली नसल्याने शासनाकडून निर्बंध आणखी कडक करण्यात येत आहेत. असे असतांनाही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. तसेच विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे २२ मे या दिवशी ‘मॉर्निंग वॉक’साठी रस्त्यांवर फिरणार्‍या ७० नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. या वेळी ७० पैकी ३७ नागरिक हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या सर्वांवर कारवाई करत त्यांच्याकडून ३५ सहस्र रुपये दंड वसूल केला आहे.