आंदोलकांनी महामार्गावर पेटवले टायर

सोलापूर – उजनी धरणातील पाणी इंदापूरला वळवण्याचा निर्णय अधिकृतरित्या रहित करावा, या मागणीसाठी उजनी धरण पाणी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी २४ मे या दिवशी उपरी (तालुका पंढरपूर) येथे पंढरपूर-सातारा राष्ट्रीय महामार्गावर टायर पेटवून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या विरोधात आंदोलन केले.
सांडपाण्याच्या नावाखाली इंदापूरसाठी संमत केलेले ५ टी.एम्.सी. पाणी त्वरित रहित करून तसा शासन आदेश काढावा, या मागणीसाठी २४ मे पासून पंढरपूर येथे या आंदोलनाचा प्रारंभ झाला. पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर, तसेच दीपक वाडदेकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तालुक्यातील शेतकर्यांनी आंदोलन चालू केले आहे. इंदापूरसाठी संमत केलेले पाणी रहित करावे, अन्यथा याहून तीव्र आंदोलन केले जाईल, अशी चेतावणीही सचिव माऊली हळणकर यांनी या वेळी दिली.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
पाकव्याप्त काश्मीरमधील जनआंदोलन आणि भारताची रणनीती !
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद