सौ. जान्हवी अभिजीत विभूते यांचा स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेविषयी असलेला प्रगल्भ दृष्टीकोन अन् त्यांना लाभलेली संतांची प्रीती !

वैशाख शुक्ल पक्ष षष्ठी (१८.५.२०२१) या दिवशी रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणारे श्री. अभिजीत आणि सौ. जान्हवी विभूते यांच्या लग्नाचा ६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त श्री. अभिजित यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भात आलेली अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

श्री. अभिजीत विभूते

सौ. जान्हवी विभूते

श्री. अभिजित आणि सौ. जान्हवी विभूते यांना विवाहाच्या ६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !

​‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला आणि माझी पत्नी सौ. जान्हवी हिला रामनाथी आश्रमात स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्याची संधी मिळाली. सौ. सुप्रिया माथूर प्रक्रिया राबवणार्‍या साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा  घेतात. त्यांनी सांगितलेली सूत्रे जान्हवीने लगेच आचरणात आणण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी जान्हवीशी बोलतांना माझ्या लक्षात आलेली सूत्रे येथे दिली आहेत.

१. सौ. जान्हवीचा आढावा देतांना दृष्टीकोन – दुखणे दूर होण्यासाठी आधुनिक वैद्यांना आपण सर्व त्रास सांगतो, त्याप्रमाणे आढाव्यात आपले स्वभावदोष आणि अहं यांविषयी स्पष्ट सांगितल्यास त्यावर उपाय मिळून भवरोगातून लवकर मुक्त होता येईल !

​सुप्रियाताईंनी आम्हाला ही प्रक्रिया राबवण्याचे महत्त्व सांगितले. तेव्हा आम्हाला ही प्रक्रिया राबवण्याचा आलेला ताण न्यून झाला आणि आमचा उत्साह वाढला. मी जान्हवीला विचारले, ‘‘आढावा सांगतांना तू काय दृष्टीकोन ठेवतेस ?’’ ती म्हणाली, ‘‘आधुनिक वैद्यांकडे गेल्यावर आपला त्रास लवकर दूर व्हावा; म्हणून आपण आपल्याला होत असलेल्या सर्व त्रासांविषयी सांगतो. त्याप्रमाणेच ‘आपल्यातील कोणते स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू आपल्याला त्रास देतात ?’, हे आढावा सेवकाला सांगितले, तरच ते आपल्याला साहाय्य करू शकतील. आपण आढावा सेवकाला मनातील विचार जितक्या मनमोकळेपणाने सांगू, तितक्या लवकर आपल्याला योग्य उपाय मिळतील आणि आपण या भवरोगातून मुक्त होऊ !’’

२. जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होण्यासाठी भगवंताला जा शरण ।

गुरुदेवांच्या कृपेने जान्हवीला

लागली स्वभावदोष-अहं निर्मूलन प्रक्रियेतील आनंदाची ओढ ।

समष्टीत सेवा करतांना तू त्याला दे साधनेची जोड ॥ १ ॥

प्रत्येक सेवा भावपूर्ण करून गुरुदेवांचे कर तू स्मरण ।

जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त

होण्यासाठी भगवंताला जा शरण ॥ २ ॥

३. जान्हवीने अनुभवलेली संतांची प्रीती !

३ अ. प.पू. अण्णा राऊळ महाराज : मी जान्हवीला पिंंगुळी (सिंधुदुर्ग) येथे प.पू. अण्णा महाराज यांच्याकडे घेऊन गेलो होतो. तिथे त्यांचे भक्तही होते. प.पू. अण्णा महाराज यांनी जान्हवीला नारळ दिला. तिने तो पदरात घेतला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘याला म्हणतात संस्कार !’’ त्यांनी तिला भरभरून आशीर्वाद दिले !

३ आ. प.पू. परुळेकर महाराज : प.पू. परुळेकर महाराजांनी जान्हवीवर मुलीप्रमाणे प्रेम केले. आम्ही दोघेही त्यांचे चरण दाबण्याची सेवा करत होतो. तेव्हा ते तिला म्हणाले, ‘‘माहेरपणासाठी माझ्याकडे येऊन रहा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सतत स्मरण कर.’’

३ इ. प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी (माई ) नाईक : आम्ही प.पू. दास महाराज यांच्याकडे गेल्यावर त्यांनी जान्हवीला पूर्ण आश्रम स्वतः फिरून दाखवला. आई-वडील मुलीची काळजी घेतात, तसे त्यांनी तिला प्रेम दिले. पू. (सौ.) माईंनी तिला साडी देऊन तिची ओटी भरली.’

– श्री. अभिजीत विभूते, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.४.२०२१) ​

रामनाथी आश्रमात हालसिद्धनाथांच्या भाकणुकीच्या कार्यक्रमाच्या वेळी श्री. अभिजीत विभूते यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे झालेले दर्शन !

१. हालसिद्धनाथांच्या भाकणुकीच्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर दर्शनासाठी आल्यावर साधकाजवळ थांबणे आणि त्या क्षणी ‘क्षणभर काळ थांबला आहे’, असे वाटून भावाश्रू येणे

​‘रामनाथी आश्रमात हालसिद्धनाथांचा भाकणुकीचा कार्यक्रम होता. तेव्हा माझी पत्नी, जान्हवी हिला ‘परात्पर गुरु डॉक्टरांंंना एकदा पहावे’, अशी तीव्र इच्छा होती; पण ‘या कार्यक्रमात ते कसे दिसणार ?’, असे वाटून ईश्‍वरेच्छेवर सर्व सोडून ती सेवा करत होती. कार्यक्रमाच्या वेळी हालसिद्धनाथांच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टर तेथे आले. तेव्हा मी आणि जान्हवी व्यासपिठाजवळ उभे होतो. गुरुदेवांना पाहून दोघांचेही अश्रू थांबत नव्हते. त्या वेळी ‘थोडा वेळ काळच थांबला आहे !’, अशी मला अनुभूती आली.

२. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चरणकमल आणि रूप हृदयात साठवून ठेवावे’, असे वाटणे

​मला ‘गुरुदेवांचे रूप आणि त्यांचे चरणकमल हृदयात साठवून ठेवावे’, असे वाटले. सभोवती सर्व भक्तमंडळी असतांनाही मला केवळ गुरुदेवच दिसत होते. मी गुरुदेवांना मनातून म्हणालो, ‘‘गुरुदेवा, तुमच्यापासून मी पुष्कळ दूर गेलो आहे.’’ तेव्हा त्यांनी ‘‘भावाच्या स्तरावर प्रयत्न करा’’, असे मला सांगितले.

​‘आम्हा उभयतांना सूक्ष्मातूनही तुमच्या चरणांचा दास होऊन रहाण्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यास शक्ती मिळावी’, हीच तुमच्या कोमल चरणी प्रार्थना !’

– श्री. अभिजीत विभूते, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.