इस्रायलकडून गाझा पट्टीवर बॉम्बवर्षाव चालूच

तेल अवीव (इस्रायल) – इस्रायलच्या लढाऊ विमानांनी १७ मे या दिवशी सकाळी गाझा पट्टीवर जवळपास १० मिनिटे बॉम्बफेक केली. ‘हे आक्रमण २४ घंट्यांंपूर्वी केलेल्या आक्रमणापेक्षाही मोठे होते’, असे म्हटले जात आहे. ‘लढाऊ विमाने केवळ आतंकवाद्यांच्या ठिकाणांवर आक्रमणे करत आहेत’, असे इस्रायल डिफेन्स फोर्सने म्हटले आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी, ‘या संघर्षासाठी इस्रायलवर आक्रमण करणारे उत्तरदायी आहेत. अजूनही हे ऑपरेशन संपले नाही आणि जोपर्यंत याची आवश्यकता भासत रहाणार, तोपर्यंत ऑपरेशन चालूच रहाणार आहे’, असे  म्हटले आहे.