युरोपमधील ३० पैकी २० देशांतील दळणवळण बंदी टप्प्याटप्याने उठण्याची शक्यता !

लंडन – युरोपमधील विविध देशांत लसीकरणाचा वेग वाढत असल्याने कोरोना महामारी पसरण्याचा वेग मंदावू लागला आहे. अनेक देशांनी प्रवासावरील बंदी हटवली आहे. १७ मेपासून ब्रिटनमध्ये दळणवळण बंदी उठवली जाऊ शकते. युरोपमधील ३० पैकी २० देशांत सध्या दळणवळण बंदी आहे. काही देशांत सशर्त स्वरूपात कार्यक्रमांना अनुमती देण्यात आली आहे. इटली, स्पेन आणि फ्रान्स देशांमध्ये हॉटेल, पर्यटनस्थळ अन् आंतरराष्ट्रीय प्रवासास टप्प्याटप्प्याने अनुमती देण्यात आली आहे.