उत्तरप्रदेशमध्ये पोलिसाकडून तरुणीवर बलात्कार

रक्षक नव्हे, भक्षक पोलीस ! अशा पोलिसांना तात्काळ अटक करून बडतर्फ करत कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

काशी विश्‍वनाथ मंदिराचे पक्षकार हरिहर पांडेय यांना धर्मांधाकडून ठार मारण्याची धमकी !

मंदिरावर अतिक्रमण करूनही धर्मांध हे हिंदूंना धमक्या देतात, यातून त्यांचा उद्दामपणा दिसून येतो !

राजकीय पक्ष हिंदु राष्ट्र आणू शकत नसल्याने हिंदूंना संघटित होऊन हिंदु राष्ट्रासाठी कार्य करावे लागेल ! – शाम्भवी पिठाधिश्‍वर पू. स्वामी आनंद स्वरूप महाराज

राजकीय पक्षांच्या माध्यमातून ‘हिंदु राष्ट्र’ येऊ शकत नसल्याने हिंदूंना संघटित होऊन ‘हिंदु राष्ट्रा’साठी कार्य करावे लागेल, असे उद्गार येथील शाम्भवी पिठाधिश्‍वर पू. स्वामी आनंद स्वरूप महाराज यांनी काढले.

बांगलादेशमध्ये मशिदीमध्ये नमाजपठण करणार्‍यांवर हिफाजत-ए-हिंदच्या आतंकवाद्यांचे आक्रमण : १२ लोक घायाळ

बांगलादेशातील बायबांधा जिल्ह्यातील एका मशिदीमध्ये शुक्रवारचे नमाजपठण करण्यासाठी आलेल्या लोकांवर हिफाजत-ए-हिंद या जिहादी संघटनेच्या आतंकवाद्यांनी आक्रमण केले. यात १२ हून अधिक जण घायाळ झाले.

धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज के जीवन पर आधारित ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाें ने बनाएं विडिओ !

धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज के जीवन पर आधारित ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाें ने बनाएं विडिओ अवश्य देखे !!!

कोरोनामुळे महाराष्ट्राची स्थिती चिंताजनक !

कोरोनामुळे राज्यातील स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. कोरोनामुळे १ ते ९ एप्रिल या अवघ्या ९ दिवसांच्या कालावधीत राज्यातील २ सहस्र ४०१ नागरिकांना प्राण गमवावा लागला आहे. ८ एप्रिल या दिवशी नगर जिल्ह्यातील अमरधाम या स्मशानभूमीत एकाच दिवशी कोरोनामुळे मृत झालेल्या ४२ जणांवर अंत्यसंस्कार करावे लागले.

११ एप्रिल या दिवशीच्या ‘टास्क फोर्स’ बैठकीनंतर दळणवळण बंदीचा निर्णय घेऊ ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

१० एप्रिल या दिवशी सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष आणि अन्य राजकीय पक्ष यांच्या समवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांसह उपस्थित सर्वांनी दळवळणबंदीचे निर्बंध कडक करण्याला सहमती दर्शवली.

सर्व राज्यांनी उत्तराखंड सरकारच्या निर्णयानुसार मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करावीत अन्यथा आंदोलन करू ! – विहिंप

भाजपशासित राज्यांतील मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी विहिंपने तेथील सत्ताधारी शासनकर्त्यांशी संवाद साधून तसे प्रयत्न करावेत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे. ज्या राज्यांमध्ये हिंदुद्वेषी पक्षांची सरकारे आहेत, तेथे मात्र हिंदूंचे परिणामकारक संघटन करून आंदोलन उभारण्याला पर्याय नाही !

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था हिंदु संस्कृती सर्वांपर्यंत पोचवण्याचे कार्य अत्यंत तळमळीने करत आहेत ! – पू. डॉ. संतश्री युधिष्ठिरलाल महाराज

ही प्रभु रामकृष्ण यांची जन्मभूमी असल्याने संपूर्ण विश्‍वाला संस्कार आणि आदर्श मूल्ये देणारे हे राष्ट्र आहे. महाकुंभला दैवी कृपेचे वरदान आहे. गंगेच्या माध्यमातून दैवी कृपा होत आहे. धर्म हाच (धर्माचरण) या भूमीला (निसर्गाला) सुस्थितीत ठेवत असतो.