महागाई न्यून करण्यासाठी अनुदान आणि सेवा कर रहित करणे

‘फूड सिक्युरिटी’मध्ये ५० सहस्र कोटी रुपयांचे धान्य प्रतिवर्षी कुजते. ते कसे, तर २ लाख कोटी रुपयांचे अन्नधान्य, तेल आयात करतो. २ लाख कोटी रुपयांच्या निर्यातीसाठी सबसिडी देतो आणि ५० सहस्र कोटीचे धान्य कुजते, म्हणजे प्रतिवर्षी ४ लाख ५० सहस्र कोटीचे कर लादल्यामुळे महागाई वाढते.

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही अमरावती जिल्ह्यातील २४ गावांत वीजच नाही ! – खासदार नवनीत राणा

संसदेचे चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात येथील खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने मी विनंती करते की, केंद्र शासनाने या गावांना वीज जोडणी देण्यासाठी ‘विशेष योजना’ आखून त्यासंबधीचे आदेश द्यावेत..

आयुर्वेदाने गायीच्या दुधाला ‘अमृत’ मानणे

आयुर्वेदाने गायीच्या दुधाला ‘अमृत’ मानले आहे. यात गायीचे दूध आणि तूप यांना ‘नित्य सेवनीय आहार’ म्हटले आहे. याच्या सेवनाने विकार होत नाही. अनेक तर्‍हेच्या रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी गायीचे दूध, तूप तसेच पंचगव्यही लाभदायक आहे.

देहलीतील हिंसाचारामागे योगेंद्र यादव ! – काँग्रेसचे खासदार रवनीतसिंह बिट्टू यांचा आरोप

बिट्टू यांनी म्हटले की, जर योगेंद्र यादव यांना अटक केली गेली, तर शेतकरी आणि सरकार यांच्यामधील चर्चा पूर्णत्वाला जाऊ शकते; कारण यादव हेच या दोघांमध्ये आग लावणारे आहेत, असाही आरोप त्यांनी केला.

समाजमाध्यमांवर केंद्र सरकारच्या विरोधात लिहिणार्‍यांचीसुद्धा चौकशी करणार का ? – आमदार राम कदम यांची पत्राद्वारे विचारणा

‘सोनम कपूर, अनुराग कश्यप, स्वरा भास्कर, परिणीती चोप्रा, अली फजल यांसह अनेक कलाकारांच्या ट्वीटमध्येही अनेक शब्द आणि ‘हॅशटॅग’ एकसारखेच आहेत. तुम्ही या कलाकारांच्या ट्वीटचीही चौकशी करणार का ?’, असा प्रश्‍न कदम यांनी विचारला आहे.

धर्मांधांचा नेहमीचा कांगावा जाणा !

देशात काही लोकांकडून मुसलमानांना ‘परके’ करण्याचा संघटित प्रयत्न चालू आहेे, असा फुकाचा आरोप माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी एका कार्यक्रमात केला.

सांगली शहर भाजपच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा स्मृतीदिन हा ‘समर्पणदिन’ म्हणून साजरा !

११ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत समर्पण पंधरवडा साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतीदिनाच्या निमिताने भाजप पदाधिकारी यांनी समर्पण निधी सांगली शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे यांच्याकडे सुपुर्द केला.

राष्ट्रसेवा दल १० लाख शेतकर्‍यांच्या स्वाक्षर्‍या राष्ट्रपतींना पाठवणार !

देशातील शेतकर्‍यांच्या बाजूने उभे रहाण्याऐवजी केंद्र सरकार या आंदोलनात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे. या आंदोलनाला राष्ट्र्रसेवा दलाचा पाठिंबा आहे.

वात्सल्यस्वरूपी वैद्यगुरु परात्पर गुरुमाऊली डॉ. जयंत आठवले !

अखिल ब्रह्मांडातील प्रथम वैद्यगुरु म्हणजे गुरुमाऊली; कारण ते आपल्याला या भवरोगातून, जन्म-मृत्यूच्या भवरोगाचे हरण करून मोक्ष प्रदान करतात. याचे कारण, म्हणजे त्यांच्यातील अफाट आध्यात्मिक सामर्थ्य ! समर्थ रामदास स्वामींनी मेलेल्या व्यक्तीला पुनर्जन्म देऊन जागे केले.

वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणार्‍या आधुनिक वैद्यांसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग चालू करण्याची आवश्यकता !

रोग शारीरिक असो, मानसिक वा आध्यात्मिक असो. ‘रोगाचे निदान करून त्यावर उपचार करणे’, ही वैद्याची क्षमता असते. त्याचे कारण, म्हणजे त्यांच्यातील आध्यात्मिक आणि दैवी सामर्थ्य. आज वैद्यांची ही क्षमता कुठेतरी लोप पावत चालली आहे.