१. प.पू. दास महाराज यांचा परात्पर गुरुमाऊलीप्रतीचा भाव !
१ अ. जन्म-मृत्यूच्या भवरोगाचे हरण करून साधकांना मोक्ष प्रदान करणारे अखिल ब्रह्मांडातील प्रथम वैद्यगुरु म्हणजे परात्पर गुरुमाऊली ! : ‘अखिल ब्रह्मांडातील प्रथम वैद्यगुरु म्हणजे गुरुमाऊली; कारण ते आपल्याला या भवरोगातून, जन्म-मृत्यूच्या भवरोगाचे हरण करून मोक्ष प्रदान करतात. याचे कारण, म्हणजे त्यांच्यातील अफाट आध्यात्मिक सामर्थ्य ! समर्थ रामदास स्वामींनी मेलेल्या व्यक्तीला पुनर्जन्म देऊन जागे केले. गजानन महाराजांनी कुष्ठरोग्याला बरे केले. या भूलोकातील वैद्यगुरु म्हणजे ‘आई’, जी उदरातील बाळाचे ९ मास पालनपोषण करून त्याला जन्म देते. तान्ह्या बाळाला समजून त्याचे पोट भरते, सांभाळ करते, बाळाच्या वेदना समजून घेऊन त्याच्यावर उपचार करते.
१ आ. गुरुमाऊली आणि आई हे विनामूल्य अन् वात्सल्यभावाने उपचार करत असणे आणि ‘आईप्रमाणे प्रत्येक वैद्यामध्ये वात्सल्यभाव अन् इतरांचे दु:ख समजून घेणे’, हे गुण असणे आवश्यक असणे : मुक्या जनावरांचेही असेच आहे, उदा. गाय-वासरू, पशु-पक्षी. त्यांची आई वात्सल्यभावाने त्यांच्या पिलांचे पालनपोषण करते; म्हणून ती आई म्हणजे पृथ्वीवरील वैद्यगुरु. गुरुमाऊली आणि आई हे विनामूल्य अन् वात्सल्यभावाने अखंड उपचार करत असतात. त्यांच्या त्या प्रीतीसाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. आईप्रमाणे प्रत्येक वैद्यामध्ये ‘वात्सल्यभाव आणि इतरांचे दु:ख समजून घेणे’, हे गुण असणे आवश्यक आहे.
असे गुण असलेले आदर्श वैद्यगुरु म्हणजे विष्णुस्वरूप परब्रह्मस्वरूपी सच्चिदानंदस्वरूपी आपले परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले. त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– आपला चरणदास, प.पू. दास महाराज, पानवळ, बांदा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |