प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून कार्यालयाची तोडफोड

राज्य सरकार येथील कार्यालय दुसरीकडे कसे काय स्थलांतरित करू शकते ?, असा प्रश्‍न उपस्थित करत प्रहार संघटनेने त्यास विरोध केला आहे. कार्यालय स्थलांतरास भाजपने विरोध करून या कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून आंदोलन केले.

किल्ले प्रतापगड आणि किल्ले अजिंक्यतारा यांना राष्ट्रीय स्मारक घोषित करा !

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची उपराष्ट्रपतींकडे मागणी

शरद पवार कधी क्रिकेट खेळले नसतांनाही ते अध्यक्ष होते ! – सदाभाऊ खोत, रयतक्रांती संघटना

शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात सचिन तेंडुलकरला सल्ला देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्यांना ज्या क्षेत्रातले कळते त्यातले त्यांनी बोलावे, असे वक्तव्य केले होते. या संदर्भात सदाभाऊ खोत म्हणाले, शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का ? तरी ते अध्यक्ष होते. ते कोणत्या फडात कुस्ती खेळले ? तरीही ते कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत.

‘वक्फ बोर्डा’च्या नावाखाली संपूर्ण देशभरात ‘लॅण्ड जिहाद’ चालू !

एखाद्या भूमीवर ‘वक्फ बोर्डा’चा फलक लावण्यात आला असल्यास हिंदूंनी जागरूक रहावे. बंगाल, महाराष्ट्र, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांत ‘वक्फ बोर्डा’ने मोठ्या प्रमाणात हिंदूंची भूमी बळकावली आहे.’

कोल्हापूरमधील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात रुग्णाला दिले कालबाह्य सलाईन

रुग्णांच्या जिवाशी खेळणारे रुग्णालय प्रशासन !

धर्मांधांची अंधश्रद्धा जाणा !

पलक्कड (केरळ) येथे मदरशामधील ३० वर्षीय शिक्षिकेने अल्लाला खुश करण्यासाठी स्वत:च्या ६ वर्षीय मुलाचा गळा चिरून त्याची हत्या केली. तिला असणार्‍या ३ मुलांपैकी हा सर्वांत लहान मुलगा होता. ही महिला आता गरोदर असल्याचीही माहिती पुढे आली आहे.

हितेंद्र ठाकूर यांच्या ‘विवा’ समूहाची ३४ कोटींची मालमत्ता कह्यात

‘विवा’ समूहाची ३४ कोटी ३६ लाख रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने कह्यात घेतली आहे. वसई-विरार येथील जयेंद्र ऊर्फ भाई ठाकूर आणि त्यांचे भाऊ आमदार हितेंद्र ठाकूर यांची ही मालमत्ता आहे. पी.एम्.सी. अधिकोषातील घोटाळ्याच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

नेवासे येथे अवैध वाळू वाहतूक प्रकरणी ४ वाहने जप्त

नेवासा येथील तुकाराम महाराज मंदिराजवळ २ लक्ष १० सहस्र रुपयांची अवैध वाळू वाहतूक करतांना एका वाहन पकडले असल्याची माहिती नेवासे पोलिसांनी दिली आहे. तसेच ५ फेब्रुवारी या दिवशी ३ ठिकाणी अशाच स्वरूपाच्या कारवाईत ३ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.