गोद्वेष आणि गो-फिनाईल !

हिंदु धर्मात सांगितलेल्या पारंपरिक पद्धतींचा अवलंब केल्यास सामाजिक उत्कर्षास चालना मिळेल. यास विरोध करणार्‍या काँग्रेससारख्या पक्षांना हिंदू मतपेटीद्वारे प्रत्युत्तर देतील, हेही तितकेच खरे !

राममंदिराची देशवासियांची प्रतीक्षा लवकरच पूर्ण होईल ! – मोहन भागवत, सरसंघचालक, रा.स्व. संघ

सरसंघचालक मोहन भागवत यांनी श्रीरामंदिरासाठी विशेष कार्य केलेल्या राष्ट्रसंत सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन श्रीचरणी पुष्पांजली समर्पित केली. त्याचप्रमाणे धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांचे आशीर्वाद घेतले.

अवैध मद्य व्यवसायावरून सलग ३ वेळा कारवाई झाल्यास व्यावसायिकाच्या हद्दपारीचा प्रस्ताव !

ज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाच्या अधिकार्‍यांनी अवैध मद्य वाहतूक केल्याच्या प्रकरणी सलग ३ वेळा कारवाई झालेल्या अवैध मद्य व्यावसायिकांच्या हद्दपारीचे प्रस्ताव सिद्ध केले आहेत.

‘पद्मश्री’ पुरस्कार मिळणे, हा माझ्या कलेचा आणि सिंधुदुर्गच्या भूमीचा सन्मान ! – परशुराम गंगावणे

मला मिळालेला ‘पद्मश्री’ पुरस्कार हा माझा एकट्याचा नव्हे, तर तो माझ्या कलेचा, सिंधुदुर्गच्या भूमीचा आणि महाराष्ट्राचा सन्मान आहे, अशी भावना नुकताच पद्मश्री पुरस्कार घोषित झालेले श्री. परशुराम गंगावणे यांनी व्यक्त केली.

भारतात जन्मणार्‍या विद्वानांपासून मानवाने सदाचाराचे धडे घेणे आवश्यक !

भारताचे स्वातंत्र्य स्पष्टपणे वेदांवर आधारित आहे. त्यासाठी या विषयावर सखोल अभ्यास करून शास्त्रार्थ करून नवीन शोध लावण्याची आवश्यकता आहे. मनुस्मृतीच्या दुसर्‍या अध्यायातील विसाव्या श्‍लोकामध्ये स्पष्टपणे दिलेले आहे.

महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात मनुस्मृतीमध्ये सांगितलेली शिक्षा

कुलीन पुरुष आणि विशेषतः स्त्रियांचे अपहरण केले असता, तसेच मौल्यवान हिरे इत्यादी रत्नांची चोरी केली असता मृत्यूदंड द्यावा.

घाटंजी (जिल्हा यवतमाळ) येथील आरोग्य केंद्रात पोलिओ डोसऐवजी १२ बालकांना सॅनिटायझर पाजले !

आरोग्याच्या संदर्भात एवढा हलगर्जीपणा करणार्‍यांना वैद्यकीय सेवक म्हणता येईल काय ? बालकांच्या जिवाशी खेळणार्‍या आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांच्या निष्काळजीपणासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल !

देहली येथे ‘लिटील चॅम्प स्कूल’ शाळेत विद्यार्थ्यांचे प्रबोधन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील ‘लिटील चॅम्प स्कूल’ या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ कार्यक्रम घेण्यात आला.

‘मावळ ऍडव्हेंचर’ संस्थेकडून दिले जाणार गिर्यारोहणाचे विनामूल्य प्रशिक्षण !

बालकांमध्ये साहस आणि आत्मविश्‍वास निर्माण व्हावा, त्यांच्यातील भीती जाऊन मनोबल वाढावे, या दृष्टीने या प्रशिक्षणवर्गांचे आयोजन करण्यात आले आहे.