कोरोनाचा विषाणू किमान १० वर्षे तरी जाणार नाही ! – बायोटेक आस्थापन

पुढील १० वर्षेतरी कोरोनाचा विषाणू आपल्यासमवेतच रहाणार आहे, असे विधान बायोटेक आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उगुर साहिन यांनी केले आहे. कोरोनाविषयी एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये साहिन यांना प्रश्‍न विचारण्यात आला होता.

अमली पदार्थांसह ३ जण आणि मर्सिडीस गाडी घेतली कह्यात

गुन्हे अन्वेषण विभागाने दोनापावला येथे धाड टाकून मुंबईस्थित स्ट्रोमे कॅनडी आणि व्हेलेंटाईन परेरा, तसेच भाग्यनगरस्थित आयन अली खान यांना ८ लाख ५० सहस्र रुपये किमतीच्या अमली पदार्थांसह कह्यात घेतले आहे.

सरकारने जीर्णोद्धाराची आवश्यकता असलेली जुनी मंदिरे चांगली करावीत !

सरकारला जर मंदिरांचे व्यवस्थापन आणि बळकटीकरण करायचे असेल, तर सरकार प्रथम जुनी, पडकी आणि जीर्णोद्धाराची आवश्यकता असलेली असंख्ये मंदिरे चांगली का करत नाही ?

हिदूंसाठी शिवप्रतापदिन म्हणजे दसरा-दिवाळी यांसारखाच सण ! – मोहन शेटे, संस्थापक अध्यक्ष, इतिहासप्रेमी मंडळ

संपूर्ण विश्‍वात गाजलेल्या युद्धांपैकी एक अफझलखान वध, हे महाराजांच्या युद्धनीतीचे वैशिष्ट्य आणि शौर्याचा आदर्श आहे. आज अफझलखान वधाचे आणि शाहिस्तेखानाची बोटे छाटण्याचे छायाचित्र लावण्यास विरोध केला जातो.

वर्ष २०२१ मध्ये कर्करोगावर औषध सापडणार ! – बाबा वेंगा यांची भविष्यवाणी

बल्गेरिया येथील भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांचा वर्ष १९९६ मध्ये मृत्यू झाला असला, तरी त्यांनी पुढील अनेक दशकांविषयीची भविष्यवाणी करून ठेवली आहे. त्यांनी यापूर्वी वर्तवलेली अनेक भाकिते खरी ठरली आहेत

कास येथील श्री देवी माऊली मंदिर परिसरात जमावबंदी आदेश

वास्तविक कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर अनेक ठिकाणी मंदिरांतील उत्सव रहित करावे लागले आहेत, याचे भान ठेवून ज्यांना जत्रोत्सव साजरे करण्याची संधी मिळाली आहे, त्यांनी अधिक भक्तीभावाने त्यात सहभाग घेतला पाहिजे !

नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटे अन् आपत्तींच्या वेळी तत्परतेने साहाय्य करणार्‍या धार्मिक संस्था !

नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटे अन् आपत्तींच्या वेळी धार्मिक संस्थांनी साहाय्याचा हात तत्परतेने पुढे करून जनतेला खरा आधार दिला.

काणकोण तालुक्यातील तिर्वाळ-मार्ली या रस्त्याला गोवा मुक्तीनंतर तब्बल ६० वर्षांनी संमती

मार्ली हा काणकोण तालुक्यातील अत्यंत मागास भागातील वाडा असून येथील विद्यार्थी, आजारी आणि वयोवृद्ध व्यक्ती यांना येथील खड्डेमय रस्ता आणि वाहतूक व्यवस्थेचा अभाव यांमुळे पुष्कळ त्रास होतात.

१ जानेवारीपासून पंचायतींना समान ‘कॅडर’

राज्यातील पंचायतींना १ जानेवारीपासून समान ‘कॅडर’ लागू केला जाणार आहे. यामुळे पंचायत संचालकांना एका पंचायत कार्यालयातील कर्मचार्‍याला दुसर्‍या पंचायत कार्यालयात स्थलांतर करणे शक्य होणार आहे.

अशी कारवाई संपूर्ण देशात हवी !

उत्तरप्रदेशमध्ये वाहनांच्या क्रमांकाच्या पाट्यांवर जातीचे नाव लिहिण्याची पद्धत चालू आहे. यातून जातीचे महत्त्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे; मात्र आता उत्तरप्रदेशच्या वाहतूक विभागाने अशा प्रकारे जातीची ओळख सांगणार्‍या गाड्यांवर कारवाई करणे चालू केले आहे.