नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटे अन् आपत्तींच्या वेळी तत्परतेने साहाय्य करणार्‍या धार्मिक संस्था !

समाजात सरकारपेक्षा मंदिरे आणि धार्मिक स्थळांची विश्‍वासार्हता अधिक आहे. सरकारला जेव्हा गोरगरीब शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यात अपयश आले. मुंबईसह महाराष्ट्र जलमय झाला, तसेच विविध नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटे अन् आपत्तींच्या वेळी धार्मिक संस्थांनी साहाय्याचा हात तत्परतेने पुढे करून जनतेला खरा आधार दिला. इतकेच काय, तर दैनंदिन जीवनात आवश्यक अशा आरोग्य, अन्न आणि निवारा या मूलभूत आवश्यकताही पुरवण्यास सरकार न्यून पडल्यावर याच संस्था आधारस्तंभ म्हणून सदैव पुढे असतात.

(संदर्भ : मासिक ‘सांस्कृतिक वार्तापत्र’, १५ ऑगस्ट २००७)