वर्ष २०२१ मध्ये कर्करोगावर औषध सापडणार ! – बाबा वेंगा यांची भविष्यवाणी

नवी देहली – बल्गेरिया येथील भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांचा वर्ष १९९६ मध्ये मृत्यू झाला असला, तरी त्यांनी पुढील अनेक दशकांविषयीची भविष्यवाणी करून ठेवली आहे. त्यांनी यापूर्वी वर्तवलेली अमेरिकेतील ९/११ चे आक्रमण, वर्ष २००४ ची सुनामी आदी केलेली भाकिते खरी ठरली आहेत. त्यांनी वर्ष २०२१ विषयीही भविष्यवाणी केली आहे. सध्या ती सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यात विशेष म्हणजे ‘वर्ष २०२१ मध्ये कर्करोगावर औषध शोधण्यास यश मिळणार आहे’, असे सांगण्यात आले आहे.

बाबा वेंगा यांनी वर्ष २०२१ विषयी केलेली भविष्यवाणी

१. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या मेंदूवर आघात होऊ शकतो आणि ते बहिरे होऊ शकतात.

२. रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्यावर त्यांच्याच देशात कुणीतरी प्राणघातक आक्रमण करणार. तसेच युरोपमध्ये जिहादी आक्रमण करतील.

३. जगात काही ठिकाणी पूर आणि सुनामी यांसारखी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते.

४. विज्ञान इतकी प्रगती करील की, सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने आकाशामध्ये रेल्वे उडू शकते. पेट्रोलचे उत्पादन बंद होईल.

५. रशियाच्या जवळपास आकाशातून उल्का पिंड पडेल.

६. एक विशालकाय ड्रॅगन मानवतेवर नियंत्रण मिळवेल.

७. युरोपमध्ये रासायनिक आक्रमण होऊ शकते. युरोप खंड त्याच्या विनाशाच्या जवळ पोचला आहे.

८. पुढील २०० वर्षांमध्ये पृथ्वीवरील लोक ब्रह्मांडांतील त्यांच्या आध्यात्मिक भाऊ-बहिणींशी संपर्क साधतील. (वर्ष २०२३ मध्ये भारतात हिंदु राष्ट्रची स्थापना झाल्यावर भारत काही वर्षांत पुन्हा विश्‍वगुरु होईल आणि मग जगातील अनेक लोक हिंदु धर्मानुसार साधना करून आध्यात्मिक उन्नती करतील. त्यातूनचे परग्रहावरील त्यांच्या बंधू भगिनींशी संपर्क साधू शकतील, असेच यातून लक्षात येते ! – संपादक)