गोव्यात ‘जनता कर्फ्यू’ लादण्याचा विचार नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोव्यात ‘जनता कर्फ्यू’ लादण्याचा शासनाचा विचार नाही, तसेच या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्रालयाकडूनही काही विशेष सूचना आलेल्या नाहीत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

वेंगुर्ला शहरात चालू असलेल्या भूमीगत वीजवाहिन्यांच्या कामामुळे वाहतूक कोंडी

भूमीगत वीजवाहिन्या टाकण्यासाठी शहरातील सर्वच रस्ते खोदण्यात आले आहेत, तसेच ठेकेदार आपल्या मनप्रमाणे रस्त्यांचे खोदकाम करत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

मुंबई-गोवा महामार्ग प्रकल्पबाधितांचे प्रश्‍न त्वरित न सुटल्यास टोकाची भूमिका घ्यावी लागेल ! – आमदार नितेश राणे यांची प्रशासनाला चेतावणी

तिलारी धरण, अरुणा धरण प्रकल्प या सर्व ठिकाणच्या प्रकल्पबाधितांचे प्रश्‍न गेली कित्येक वर्षे सुटलेले नाहीत, तर ५ वर्षांमागील प्रकल्पबाधितांचे प्रश्‍न काय सुटणार ?

आगामी विधानसभा निवडणुकीत मगो भाजपशी युती करणार नाही !

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपशी युती करण्याची शक्यता महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष श्री. दीपक ढवळीकर यांनी नाकारली आहे.

मगो पक्षाच्या अध्यक्षपदासाठी जानेवारी २०२१ मध्ये निवडणूक

जानेवारी २०२१ मध्ये पक्षाचे अध्यक्षपद आणि समितीचे इतर सदस्य यांसाठीची निवडणूक घेण्यात येईल, अशी माहिती मगो पक्षाचे अध्यक्ष श्री. दीपक ढवळीकर यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘निवडणुकीसाठी कार्यक्रम ठरवण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार घोषित

कै. अरविंद शिरसाट यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ यावर्षी दोडामार्गमधील तेजस देसाई यांना जिल्हा पत्रकार संघाचा पुरस्कार घोषित झाला आहे.

गोव्यात नवीन ९० कोरोनाबाधित

गोव्यात २४ डिसेंबरला ९० नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. कोरोनामुळे दिवसभरात १ मृत्यू झाला आहे, तर ८८ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंतचे एकूण मृत्यू ७२८ झाले आहेत.

संधीसाधू काँग्रेस !

एवीतेवी लोकशाहीचा टेंभा मिरवणारी काँग्रेस स्वतःचा स्वार्थ साधतांना नेहमीच लोकशाहीचा गळा घोटते, हाही इतिहास आहे. कृषी कायद्याचेच पहायचे झाले, तर हा कायदा लोकशाही मार्गाने सार्वभौम संसदेने संमत केला. तरीही काँग्रेस यास विरोध करून एक प्रकारे लोकशाहीचा अवमानच करत नाही का ?

देहली विमानतळावरून खलिस्तानी आतंकवाद्याला अटक

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) गेल्या काही वर्षांपासून पसार असणार्‍या खलिस्तानी आतंकवादी गुरजीतसिंह निज्जर याला देहली विमानतळावरून अटक केली. वर्ष २०१७ मध्ये निज्जर सायप्रस या देशामध्ये पळून गेला होता.

गीता असे समस्त वेदांचा सार, गीता असे दिव्य ज्ञानाचे भांडार !

गीतेमुळे जीवनाचे ध्येय सुस्पष्ट होते । ज्ञानाच्या तेजासह भक्तीचे अमृतही लाभते ॥
विविध योगमार्गांचे महत्त्व कळते । आणि जिवाची मोक्षाकडे वाटचाल होते ॥