प्रत्येकाला औषध लिहून देण्याची अनुमती देता येणार नाही ! – सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – प्रत्येकाला औषधे लिहून देण्याची अनुमती देता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिली. कोरोनाच्या संसर्गावरील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुषच्या डॉक्टरांना केंद्र सरकारने संमत केलेले मिश्रण आणि गोळ्या रुग्णाने घेण्यासाठी लिहून देण्याच्या केरळ उच्च न्यायालयाच्या अनुमतीच्या विरोधातील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने हा निर्णय दिला.

तसेच ‘याविषयी आयुष मंत्रालयाने काही दिशानिर्देश दिले आहेत का ?’, अशी विचारणाही न्यायालयाने सॉलिसिटर जनरल यांच्याकडे केली.