पिंपरी येथील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक निलंबित !
गंभीर गुन्ह्यातील तपासात अधिकार्यांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या दोन अधिकार्यांना निलंबित केले.
गंभीर गुन्ह्यातील तपासात अधिकार्यांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या दोन अधिकार्यांना निलंबित केले.
कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रहित झाल्यानंतर आता रिझर्व्ह बँकेकडून कोल्हापूर येथील सुभद्रा लोकल एरिया या बँकेचा परवाना रहित करण्यात आला आहे.
कोरोना महामारीच्या काळात नागरिक ‘ऑनलाईन’ खरेदीवर भर देतांना दिसत आहेत; मात्र या प्रकारात नागरिकांची फसवणूक होण्याच्या प्रकारांतही शहरात वाढ झाली असून मागील ११ मासांत पुण्यातील अडीच सहस्र नागरिकांची ऑनलाईन खरेदी-विक्री करतांना फसवणूक झाली आहे.
रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे यांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही, त्यामुळे पोलिसांनी आता त्यांच्याशी संबंधित आणि कार्यालयीन सहकार्यांकडेही चौकशी चालू केली आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर, तुळजापूर, अंबाजोगाई, पंढरपूर येथे निवेदन सादर
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, तसेच नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही २५ डिसेंबर २०२० ते ५ जानेवारी २०२१ या कालावधीत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या ठिकाणी १ जानेवारी या दिवशी होणार्या अभिवादन कार्यक्रमासाठी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
महानगरपालिकेच्या ‘वाय.सी.एम्.’ रुग्णालयामध्ये ‘मी पोलीस आहे’ असे म्हणत सुरक्षा रक्षकाने रुग्ण तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
प्रेस नावाच्या ‘व्हॉट्सॲप’ गटावर २५ डिसेंबर या दिवशी अश्लील ध्वनीचित्रफीत प्रसारित केल्यामुळे पाटण (जिल्हा सातारा) येथील नगरपंचायतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सचिन कुंभार यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता.
पोलीस मुख्यालयाच्या पूर्वेच्या दगडी भिंतीला एक पथदीप बसवण्यात आला आहे. हा पथदीप दिवसा-उजेडी चालू असून त्याकडे पोलीस दलातील सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे.