भर दिवसा पथदीप चालू ठेवून पैशाचा अपव्यय करणार्यांकडून हानीभरपाई घेणे अपेक्षित आहे !
सातारा, २५ डिसेंबर (वार्ता.) – पोलीस मुख्यालयाच्या पूर्वेच्या दगडी भिंतीला एक पथदीप बसवण्यात आला आहे. हा पथदीप दिवसा-उजेडी चालू असून त्याकडे पोलीस दलातील सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. याविषयी मुख्यालयात तोंडी कल्पना देऊनही संबंधित याकडे दुर्लक्ष करतांना दिसून येते. महाराष्ट्रात वीजदेयकांवरून रणकंदन माजलेले असतांना जिल्हा पोलीस दलाकडून विजेची उधळपट्टी होतांना दिसत आहे, अशी चर्चा नागरिकांत होत आहे.