पुणे – ब्रिटनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारने महापालिकांच्या हद्दीत संचारबंदी लागू केली आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, तसेच नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही २५ डिसेंबर २०२० ते ५ जानेवारी २०२१ या कालावधीत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
तळेगाव औद्योगिक वसाहत, चाकण औद्योगिक वसाहत, हिंजवडी आयटी पार्क, तसेच लोणावळा भूशी डॅम, मुळशी डॅम, ताम्हिणी घाट, सिंहगड रोड, खडकवासला या पर्यटन स्थळी, फार्म हाऊस, रिसॉर्ट या ठिकाणी ही जमावबंदी आहे.