उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. आगस्त्य अधाने हा या पिढीतील एक आहे !
चि. आगस्त्य सागर अधाने याला द्वितीय वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. जन्मापूर्वी
१ अ. सुनेला स्वप्नात गुरुदेवांचे दर्शन होणे : ‘माझ्या सुनेला (सौ. प्रिया सागर अधाने हिला) गर्भधारणा होण्याच्या १० दिवस आधी स्वप्नात गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) दर्शन झाले. गुरुदेवांनी तिला आशीर्वाद दिला.
१ आ. सुनेने मंदिरात जाणे, श्रीरामरक्षा आणि हनुमान चालीसा म्हणणे अन् तिला प.पू. शिवनगिरीकर महाराज यांचे मार्गदर्शन मिळणे : प्रिया प्रतिदिन मारुति आणि शिव यांच्या मंदिरात जात असे अन् गायीला चारा देत असे. ती श्रीरामरक्षा आणि हनुमान चालीसा म्हणत असे. ती गुरुवारी मंदिरात नाथांच्या दर्शनाला जात असे. आमची कानिफनाथ भगवान यांच्यावर पुष्कळ श्रद्धा आहे. प्रियाला गरोदरपणात वडोद कान्होबा येथील कानिफनाथ मंदिरातील गुरु प.पू. शिवनगिरीकर महाराज यांचे मार्गदर्शन लाभले.
१ इ. सुनेला डेंग्यू झाल्यावर नामजपादी उपाय केल्यावर ३ दिवसांत ताप न्यून होणे : प्रिया ७ मासांची गर्भवती असतांना तिला डेंग्यू झाला होता. आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘तिचा ताप उतरण्यास ७ – ८ दिवस लागतील.’’ तेव्हा आम्ही घाबरलो आणि आम्ही गुरुदेवांना कळकळीची प्रार्थना केली. आम्ही नामजपादी उपाय केल्यामुळे तिचा ताप ३ दिवसांत न्यून झाला.
२. जन्म ते एक वर्ष
२ अ. आमची नाथांवर श्रद्धा आहे. नाथषष्टीच्या दिवशी सुनेची शस्त्रकर्म करून प्रसुती झाली आणि तिला मुलगा झाला.
२ आ. आगस्त्य ३ मासांचा असतांना आम्ही त्याला कानिफनाथ मंदिरात घेऊन गेलो होतो. तेव्हा तेथील गुरु प.पू. शिवनगिरीकर महाराज म्हणाले, ‘‘आगस्त्य भाग्यवान आहे. त्याला बालपणापासून नाथांचे दर्शन होत आहे.’’
२ इ. प्रथम वाढदिवसाच्या दिवशी पुष्कळ पाहुणे येऊनही शांत असणे : आमच्या घरी ४ – ५ पाहुणे आले, तरीही आगस्त्य रडत असे. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी २०० लोक आले होते. तेव्हा तो जराही रडला नाही.
३. वय १ ते २ वर्षे
३ अ. देवाची ओढ
१. तो एखादा पदार्थ खाण्यापूर्वी तो पदार्थ देवाच्या चित्रापुढे ठेवतो.
२. तो रडत असतांना आम्ही भ्रमणभाषवर हनुमान चालीसा लावल्यावर तो शांत होतो.
३. तो देवाच्या चित्राजवळ जाऊन टाळ्या वाजवतो.
४. त्याचे वडील त्याला शनिवारी शनिमंदिरात घेऊन जातात. तो तिथे डोके टेकवून नमस्कार करतो.
५. आम्ही शिर्डी येथे गेलो असतांना साईबाबांच्या मंदिरातील पुजार्यांनी आगस्त्यला घेऊन त्याचे डोके समाधीवर टेकवले.
३ आ. प्राण्यांविषयी प्रेम : आमच्या घरी तुळशीजवळ मातीची गाय आणि वासरू ठेवले आहे. आगस्त्य कुंडीतील पाने तोडून गायीला देतो.’
– श्रीमती अनिता अधाने (चि. आगस्त्यची आजी, वडिलांची आई), छत्रपती संभाजीनगर (१.६.२०२४)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.