साधना करण्याची आवड असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा मैसुरू, कर्नाटक येथील कु. अक्षज पालतोड शशिकुमार (वय १५ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. अक्षज पालतोड शशिकुमार हा या पिढीतील एक आहे !

(‘वर्ष २०२५ मध्ये कु. अक्षज पालतोड शशिकुमार याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे.’ – संकलक)

फाल्गुन शुक्ल षष्ठी (५.३.२०२५) या दिवशी कु. अक्षज पालतोड शशिकुमार याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईच्या लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. अक्षज पालतोड शशिकुमार याला १५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !

कु. अक्षज पालतोड

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

–  सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. नीटनेटकेपणा  

‘अक्षज घरातील वस्तू व्यवस्थित ठेवतो.

२.  इतरांचा विचार करणे 

तो इतरांची काळजी घेतो आणि इतरांना त्यांच्या कामात साहाय्य करतो. घरातील कुणी रुग्णाईत असल्यास अक्षज त्यांची कामे करतो.

३. अक्षज नेहमी खरे बोलतो, तसेच तो त्याच्या लहान भावालाही खरे बोलायला सांगतो.

सौ. विद्या शशिकुमार

४. धर्माचरणाची आवड  

तो प्रतिदिन कपाळाला टिळा लावून शाळेत जातो. तो देवघरात दिवा लावणे, श्लोक म्हणणे इत्यादी कृती करतो.

५. साधनेची आवड

अ. तो प्रतिदिन नामजप करतो. तो अभ्यास करतांना प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करतो.

आ. अक्षज सतत साधनेविषयी आणि देवाविषयी बोलतो. तो वेगवेगळ्या बालसाधकांबद्दल सांगत असतो. तो सत्संगात त्याच्या शंका विचारतो. तो त्याच्या लहान भावाला चांगल्या गोष्टी सांगतो.

इ. तो दैनंदिनी लिहून त्यानुसार कृती करण्याचा प्रयत्न करतो.

६. चुकांविषयी संवेदनशील 

तो स्वतःकडून झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागतो.

७. सेवेची आवड  

तो धर्मशिक्षण फलक लिहिण्याची सेवा करतो.

८. संतांप्रती भाव 

तो संतांशी मोकळेपणाने बोलून त्यांना साधनेविषयी विचारून घेतो. पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे संत, वय ४८ वर्षे) यांना पाहिल्यानंतर अक्षजची भावजागृती होऊन त्याच्या डोळ्यांत भावाश्रू येतात.’

– सौ. विद्या पालतोड शशिकुमार (कु. अक्षजची आई), मैसुरू, कर्नाटक. (२३.५.२०२४)