उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. प्रार्थना तेरदाळ या पिढीतील एक आहे !
‘फाल्गुन पौर्णिमा (१४.३.२०२५) या दिवशी कु. प्रार्थना तेरदाळ हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आजीच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. प्रार्थना तेरदाळ हिला १६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

‘वर्ष २०१६ मध्ये ‘कु. प्रार्थना तेरदाळ उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२५ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (४.३.२०२५)
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. मितभाषी

‘कु. प्रार्थना शांत स्वभावाची आहे. ती इतरांशी आवश्यक तितकेच बोलते.
२. नीटनेटकेपणा
ती सर्व वस्तू व्यवस्थित ठेवते. आम्ही गावी गेल्यावर ती घर नीटनेटके ठेवते.
३. वक्तशीर
ती प्रत्येक काम वेळेत पूर्ण करते.
४. साधनेची तळमळ
अ. ती सकाळी उठताच प्रार्थना करून ‘घर आश्रम आहे’, असे समजून घरातील कामे सेवा म्हणून करते.
आ. ती सकाळी लवकर उठून देवाची पूजा करते. ती देवाला प्रार्थना आणि थोडा वेळ नामजप करते. ती सायंकाळी शाळेतून घरी आल्यानंतर थोडा वेळ एकाग्रतेने आणि भावपूर्ण नामजप करते.
इ. तिच्याकडून चुका झाल्यास ती त्या स्वीकारून क्षमायाचना करते.
ई. ती म्हणते, ‘‘प.पू. गुरुदेवांना अपेक्षित असे आपण वागायला हवे. आता आपण योग्य प्रयत्न केले, तरच आपण ईश्वरी राज्यात राहू शकतो .’’
५. सेवेची ओढ
ती आठवड्यातून एकदा आमच्या कुटुंबातील ५ मुलांचा सत्संग घेते. ती त्यांना प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करायला सांगते. ती त्यांना लहानशी कथा सांगते. ती त्यासाठी माझे साहाय्य घेते.
६. देवाप्रती उत्कटभाव
अ. ती प्रार्थना भावपूर्ण करते. त्यामुळे तिची भावजागृती होते.
आ. तिने कुटुंबातील सर्वांकडून प्रार्थना करून घेतल्यास सर्वांना चैतन्याची अनुभूती येते.’
– सौ. उमा ठोमके (कु. प्रार्थनाची आजी (आईची आई), वय ६१ वर्षे), कोल्हापूर (२६.५.२०२४)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.