गुरूंप्रती भाव असलेला ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा सिद्धापूर, उडुपी, कर्नाटक येथील कु. संजय पुजारी (वय १० वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. संजय पुजारी हा या पिढीतील एक आहे !

फाल्गुन शुक्ल षष्ठी (५.३.२०२५) या दिवशी कु. संजय पुजारी याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईच्या लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. संजय पुजारी याला दहाव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

कु. संजय पुजारी

‘वर्ष २०१६ मध्ये कु. संजय पुजारी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२५ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ५५ टक्के झाली आहे. त्याच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, त्याची साधनेची तळमळ आणि त्याच्यातील भाव यांमुळे आता त्याची साधनेत प्रगती होत आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२०.२.२०२५)


‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. बुद्धीमान 

सौ. वासंती पुजारी

‘कु. संजयचा परीक्षेत नेहमी प्रथम क्रमांक येतो.

२. इतरांना साहाय्य करणे  

तो आम्हाला घरकामांत आणि सेवेत साहाय्य करतो. तो कधी कधी स्वयंपाक करतो.

३. सात्त्विकतेची आवड  

त्याला सात्त्विक अन्न आवडते. तो सात्त्विक कपडे घालतो.

४. तो प्रतिदिन टिळा लावतो. 

५. धर्माभिमान 

तो प्रतिदिन स्वरक्षण प्रशिक्षण प्रकारांचा सराव करतो. तो उत्सवाला गेल्यावर हिंदूंच्याच दुकानातून खरेदी करतो.

६. साधनेची आवड  

तो साधनेच्या संदर्भात प्रश्न विचारतो. तो आम्हाला त्याला भगवद्गीता आणि श्लोक शिकवायला सांगतो. तो सनातनचे ग्रंथ वाचून त्यातील सूत्रे इतरांना सांगण्याचा प्रयत्न करतो. तो भजने म्हणण्याचा सराव करतो. त्याला संगीत शिकण्याची आवड आहे. तो त्याच्या वडिलांना महाभारत आणि रामायण यांतील कथा सांगायला सांगतो. तो प्रतिदिन अर्धा घंटा बसून नामजप करतो. तो सारणी लिखाण करतो. तो ‘मी संत होणार आहे’, असे सांगतो.

७. चुकांविषयी संवेदनशील 

त्याच्याकडून चूक झाल्यास तो लगेच क्षमायाचना करतो. तो चुकांचा अभ्यास करून सांगतो.

८. सेवेची आवड  

त्याला सण किंवा कार्यक्रम यांची माहिती मिळाल्यावर तो आम्हाला ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करायला सांगतो. तो आम्हाला ‘बालसंस्कारवर्ग घ्यायला जाऊया’, असे सांगत असतो. तो समष्टी सेवेचे चिंतन करतो. तो स्वत: पुढाकार घेऊन ग्रंथकक्षावर वस्तूंची मांडणी करतो.

९. गुरूंप्रती भाव  

तो ‘प्रत्येक कृती केल्यावर ती परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळेच झाली’, असा भाव ठेवून कृतज्ञता व्यक्त करतो. तो सांगतो, ‘‘आपले परम पूज्य गुरुदेव सर्वश्रेष्ठ आहेत.’’ तो ‘आमचे गुरु श्रीमन्नारायणाचे अवतार आहेत’, असा भाव ठेवून त्यांच्या छायाचित्राची पूजा करतो.

– सौ. वासंती पुजारी (कु. संजयची आई), सिद्धापूर, उडुपी, कर्नाटक. (३०.५.२०२४)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.