उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. दिवित सार्थक मक्कर हा या पिढीतील एक आहे !
(‘वर्ष २०२५ मध्ये चि. दिवित सार्थक मक्कर यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे.’ – संकलक)
फाल्गुन शुक्ल त्रयोदशी (१२.३.२०२५) या दिवशी चि. दिवित सार्थक मक्कर याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईच्या लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
चि. दिवित सार्थक मक्कर याला पाचव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. समंजस

‘आम्ही दिवितला एखादी गोष्ट समजावून सांगितल्यास तो ऐकतो.
२. देवाची ओढ
तो शाळेतून घरी येतांना वाटेत असलेल्या मंदिरात जातो आणि हात जोडून प्रार्थना करतो. दिवितला कधी थंडी वाजायला लागली किंवा जखम झाली, तर तो ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करतो.
३. चुकांविषयी संवेदनशील
त्याच्याकडून एखादी चूक झाल्यास तो लगेच कान पकडून ‘माझ्याकडून चूक झाली’, असे म्हणून क्षमायाचना करतो.
४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव आणि श्रद्धा
अ. तो झोपतांना स्वत:जवळ सनातनचा लघुग्रंथ ठेवतो. तो त्या ग्रंथातील परम पूज्यांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) छायाचित्र पुनःपुन्हा पहातो आणि त्यावर मस्तक टेकवून नमस्कार करतो.
आ. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी त्याला एक साबण आणि पावडर दिली होती. ‘‘ते परम पूज्यांनी पाठवले आहे’’, असे सांगून तो ते प्रतिदिन थोडे थोडे वापरत होता. जेणेकरून ते लवकर संपणार नाही.
इ. त्याला दुखापत झाली, तर तो स्वतःहून परम पूज्यांना प्रार्थना करतो आणि ‘आता बरे होईल’, असे सांगतो.
५. अनुभूती
त्याला ‘स्केटिंग’ (बर्फावर किंवा समतल पृष्ठभागावर चाके लावलेले विशिष्ट प्रकारचे बूट घालून घसरून चालणे किंवा खेळणे) करतांना पुष्कळ अडचण येत असे. एक दिवस ‘स्केटिंग’ करायला जाण्यापूर्वी त्याने परम पूज्यांना प्रार्थना केली, ‘आपण आम्हाला साहाय्य करा.’ त्या दिवशी दिवितने आम्हाला सांगितले, ‘माझी भीती न्यून झाली आणि मी ‘स्केटिंग’ सहजतेने खेळू शकलो.’’
– सौ. श्वेता मक्कर (चि. दिवितची आई), जबलपूर, मध्यप्रदेश. (१३.५.२०२४)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |