उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. अविशा प्रणव माणिकपुरे ही या पिढीतील एक आहे !
‘फाल्गुन कृष्ण द्वितीया (तुकाराम बीज १६.३.२०२५) या दिवशी चि. अविशा प्रणव माणिकपुरे हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आजी आणि आत्या यांच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
चि. अविशा प्रणव माणिकपुरे हिला ५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. जन्म ते १ वर्ष
१ अ. हसतमुख : ‘चि. अविशा सकाळी उठतांना कधीही रडत नसे. ती सतत हसत असते.
१ आ. ती रडत असतांना तिची दृष्ट काढल्यास ती शांत होत असे.
१ इ. देवाची आवड
१. आम्ही प्रतिदिन भ्रमणभाषवर श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचा पाळणा लावल्यावर ती दुपारी अन् रात्री शांत झोपत असे.
२. वय १ ते ३ वर्षे
अ. ती प्रतिदिन तिच्या बाबांच्या शेजारी बसून पूजा करते. तिचे सर्व श्लोक मुखोद्गत आहेत. ती संस्कृत भाषेतील श्रीरामस्तुती चांगल्या प्रकारे म्हणायचा प्रयत्न करते.
आ. तिला मंदिरात जायला आवडते. दत्ताच्या मंदिरात हरिपाठ चालू असतांना मी तिला प्रतिदिन घेऊन जात असे. तेव्हा ती शांत बसून आनंद घेत होती.
इ. तिचा देह आणि कपडे यांवर नेहमी दैवी कण आढळतात.
ई. मी नवरात्रीमध्ये ९ दिवस तिचे पूजन (कुमारिका पूजन) करते. त्या वेळी मला तिच्यामध्ये पुष्कळ देवीतत्त्व जाणवते. तेव्हा माझी पुष्कळ भावजागृती होते.
३. वय ४ ते ५ वर्षे
३ अ. व्यवस्थितपणा : ती प्रत्येक वस्तू व्यवस्थित ठेवते. ती शाळेत गेल्यावरही तिचे कपडे पुष्कळ चांगले असतात. तिचा अभ्यास झाला की, ती पुस्तके कपाटाच्या खणात आणि तिच्या शाळेच्या ‘बॅगेत’ व्यवस्थित ठेवते. ती कपाटातील खणात तिचे कपडे व्यवस्थित ठेवते.
३ आ. सात्त्विक पदार्थ आवडणे : ती बाहेरचे पदार्थ खात नाही. तिला ‘चॉकलेट किंवा आईस्क्रीम’ हे पदार्थ आवडत नाहीत. तिला सर्व फळे आणि घरात बनवलेले अन्नपदार्थ आवडतात.’
– सौ. जयश्री अ. माणिकपुरे (चि. अविशाची आजी), वर्धा
३ इ. प्रेमभाव : ‘ती सर्वांशी प्रेमाने आणि आपुलकीने बोलते. ती माझा मुलगा श्रीहरि याच्याशी पुष्कळ प्रेमाने वागते.’ – सौ. गौरी चौधरी (चि. अविशाची आत्या), गोवा.
३ ई. भाव
अ. ‘ती देवतांच्या मूर्तींना भावपूर्णरितीने नवीन कपडे घालते आणि भावपूर्ण फुले वहाते.
आ. ती ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथमालिकेतील ग्रंथ पुष्कळ वेळ पहाते आणि त्यातील छायाचित्रांकडे पाहून नमस्कार करते.’
– सौ. जयश्री अ. माणिकपुरे, वर्धा
( लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २८.२.२०२५)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.