देवाची आवड आणि गुरूंप्रती भाव असलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची जालगाव (जिल्हा रत्नागिरी) येथील चि. कृष्णाली दर्शन मोरे (वय ३ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. कृष्णाली मोरे या पिढीतील एक आहे !

जालगाव (तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी) येथील चि. कृष्णाली दर्शन मोरे हिचा १४.३.२०२५ (फाल्गुन पौर्णिमा, धूलिवंदन) या दिवशी तिथीनुसार वाढदिवस आहे. तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

(वर्ष २०२३ मध्ये चि. कृष्णाली दर्शन मोरे हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होती. – संकलक)

चि. कृष्णाली मोरे हिला तिसर्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून शुभाशीर्वाद !

चि. कृष्णाली मोरे

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ‘कृष्णालीला एखादे सूत्र सांगितल्यावर ती लगेच समजून घेते आणि त्याप्रमाणे वागते.

सौ. दूर्वा मोरे

२. तिला तिची चूक सांगितल्यावर ती चूक स्वीकारते आणि कान पकडून क्षमा मागते.

३. प्रेमभाव

अ. कृष्णाली तिच्या समवेत खेळायला आलेल्या मैत्रिणींची पुष्कळ काळजी घेते.

आ. एकदा कृष्णालीने एका गाईचा वशिंड (गाईच्या पाठीवरचा उंचवटा) पाहिला आणि ती म्हणाली, ‘‘गाईला लागले आहे. आपण तिला तिथे औषध लावूया.’’ त्या वेळी तिला त्या गाईची काळजी वाटत होती.

४. देवाची आवड

अ. आम्ही एकदा इच्छापूर्ती गणेश मंदिरात गेलो होतो. तिने तिथे नमस्कार केल्यावर तिच्याकडील एक बिस्कीट प्रसाद म्हणून देवासमोर ठेवले. तिने तिच्या पाकीटातील सर्व पैसे दानपेटीत टाकले.

आ. एकदा दापोली येथे एका उपाहारगृहात सत्यनारायणाची पूजा केली होती. तेथे आम्ही नमस्कार करण्यासाठी गेलो होतो. कृष्णालीला ‘ते उपाहारगृह, म्हणजे एक मंदिरच आहे’, असे वाटले. तेव्हा तिने उपाहारगृहाच्या बाहेर चप्पल काढून बाहेरच्या पायरीवर डोके टेकवून नमस्कार केला, तसेच आत जाऊन पूजेच्या ठिकाणीही भावपूर्ण नमस्कार केला.

५. गुरूंप्रती भाव

अ. कृष्णालीला आम्ही ‘‘तुझ्यासोबत कोण असते ?’’, असे विचारल्यावर ती सांगते, ‘‘माझ्यासमवेत माझे गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) असतात.’’ एकदा मी तिला म्हणाले, ‘‘तिकडे जाऊ नको, तू पडशील.’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘मी पडणार नाही; कारण माझ्यासोबत माझे गुरुदेव आहेत. मी गुरुदेवांची लाडकी आहे.’’

आ. ती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची छायाचित्रे पहाते. तेव्हा ती त्यांना भावपूर्ण नमस्कार करते. ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जयघोषही अचूक आणि भावपूर्ण करते.’

– सौ. दूर्वा दर्शन मोरे, (कृष्णालीची आई), जालगाव, सुतारकोंड, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. (३.३.२०२५)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.