जिज्ञासू ज्ञानाचा अधिकारी !

अमेरिकेच्या जलतरणपटू आणि ऑलिम्पिकमध्ये ५ सुवर्णपदकांची लयलूट करणार्‍या मिसी फ्रँकलीन यांनी ‘हिंदु धर्मग्रंथ वाचून मानसिक शांतता मिळते’, असे उद्गार काढले.

असंवेदनशील व्यवस्था !

असुरक्षित वातावरण हे महाराष्ट्रासाठी नवीन नाही. ते तर महाराष्ट्राच्या पाचवीलाच पुजलेले आहे. याचा प्रत्यय पुन्हा एकदा कर्जत-आपटा बसगाडीमध्ये सापडलेल्या आयइडी बॉम्बच्या घटनेनंतर आला.

महा‘ठग’बंधन

आगामी निवडणुकीत मोदी आणि भाजप यांना हरवण्यासाठी ‘महागठबंधन’ची आरोळी दिल्यानंतर महाराष्ट्रातील पहिली प्रचारसभा नांदेडमध्ये पार पडली. या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘राफेल’चे भूतच सरकारला गाडेल’,….

वि(भ)कास ! 

एखाद्या शहरात मेट्रो उभारण्यासाठी ज्या काही पालटांशी जुळवून घ्यावे लागत आहे, त्यांतील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृक्षतोड. यापूर्वीच सिमेंटच्या जंगलाच्या सर्वत्र प्रचंड प्रमाणात पसरलेल्या जाळ्याने येथील वृक्ष नष्ट होऊन निसर्गाचा समतोल पुरता ढासळला आहे.

भारतियांचे जनमत !

अभिनेत्यानंतर आता राजनेता झालेले तमिळनाडूतील ‘मक्कल निधी मैय्यम’ या राजकीय पक्षाचे प्रमुख कमल हसन यांनी राजनेत्यांचा सर्वांत मोठा असलेला ‘सर्वज्ञान’ हा अवगुण दर्शवणारे विधान १७ फेब्रुवारीच्या एका कार्यक्रमात केले.

पाकचा पालनकर्ता !

कर्जात बुडालेल्या पाकला सौदी अरब २० बिलियन डॉलरचे आर्थिक साहाय्य करणार आहे. यामुळे ‘पाकला लॉटरी लागली आहे’, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. सौदी अरबचे राजकुमार महंमद बिन सलमान यांच्या पाक दौर्‍याच्या वेळी ही घोषणा करण्यात आली.

हे गृहयुद्ध जिंकावेच लागेल !

पुलवामा आक्रमण झाल्यानंतर देशभरातील राष्ट्रप्रेमी निषेध करत आहेत, उत्स्फूर्तपणे आंदोलने करत आहेत. पोवाडे, कविता यांमधून त्यांचा रोष व्यक्त करत आहेत. अशा वेळी देशातील एक वर्ग मात्र अत्यंत उलट अशी राष्ट्रविरोधी भूमिका घेतांना दिसत आहे.

४८ घंट्यांनंतरही घातक कृतीशून्यता !

पुलवामा येथे सैन्यावर झालेल्या आतंकवादी आक्रमणाला आता अनुमाने ४८ घंटे उलटून गेले आहेत. ‘या आक्रमणामागे पाकचाच हात आहे’, हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. शत्रूकडून इतका मानहानीकारक मार खाऊनही अद्याप भाजप सरकारच्या मुठी आवळल्या गेलेल्या नाहीत.

सोक्षमोक्षच लावा !

१४ फेब्रुवारीला पुलवामातील जम्मू-श्रीनगर महामार्गावर जिहादी आतंकवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआर्पीएफ्च्या) वाहन ताफ्यावर मोठा आत्मघातकी स्फोट घडवून या भारतभूमीवर ४२ सैनिकांच्या रक्ताचा सडा पाडला. या निंदनीय घटनेमुळे संपूर्ण देशच हादरून गेला. सीआर्पीएफ्च्या ७० हून अधिक बसगाड्यांमधून २ सहस्र ५०० सैनिक जात असतांना ३५० किलो स्फोटके भरलेल्या चारचाकीची धडक देऊन आत्मघातकी आतंकवादी अहमद आदिल डार … Read more

पोपटपंची !

ख्रिस्ती पाद्य्रांकडून देशविदेशात झालेल्या शब्दशः सहस्रो लैंगिक शोषणाच्या घटनांनंतर अखेर ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु असणार्‍या पोप यांनी नाईलाजास्तव अन् दिखाऊपणासाठी का होईना, जगभरातील कॅथलिक बिशपांची एक बैठक आयोजित केली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now