गांधी आणि गांधीवादी !

जे हातात आहे, तेच राखायला काँग्रेसला जमत नसतांना ‘भारत जोडो’सारख्या यात्रा करून काय साध्य होणार आहे ? ‘भारत जोडो यात्रा करून संघाला संपवणार’, अशी भाषा काँग्रेसने केली. संघ सध्या भक्कम स्थितीत आहे; मात्र त्याला संपवण्याची भाषा करणार्‍या काँग्रेसला शेवटची घरघर लागली आहे.

पूर आणि माणूसकी !

पाकमधील विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येईल; मात्र या काळात धर्मांधांच्या पाशवी वागणुकीमुळे हिंदूंच्या मनावर झालेल्या जखमांचे काय ? ‘माणूसकीशून्य आणि अत्याचारी धर्मांधांना संकटकाळात साहाय्य करायचे का ?’, हे हिंदूंनी आता ठरवायला हवे !

गैरब्राह्मण पुजार्‍यांची मागणी !

पिढ्यान्पिढ्या काटेकोर धर्माचरण केलेले, अभक्ष भक्षण न करणारे, सात्त्विक आहार-विहाराचे पालन करणारे, कर्मकांडातील बारकावे जाणणारे आणि त्याचे पालन करणारे अन् करवून घेणारे आणि मुख्य म्हणजे धर्माचरण अन् साधना करणारे पुजारी मंदिरात असणे अपेक्षित आहे.

शंकराचार्यांचा देहत्याग !

आदी शंकराचार्यांनी दीड सहस्र वर्षांपूर्वी हिंदु धर्माची पुनर्स्थापना करून धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि हिंदूंना ज्ञान मिळण्यासाठी भारताच्या चारही दिशांना धर्मपीठांची स्थापना केली अन् तेथे शंकराचार्यांची नियुक्ती केली. ही परंपरा आजही चालू आहे. स्वामी स्वरूपानंद सरस्वती हे याच परंपरेतील शंकराचार्य होते.

रामायण-महाभारत शोधणारे प्रा. लाल !

सध्याच्या पुरातत्वज्ञांनी प्रा. लाल यांचा संदेश कृतीत आणल्यास जी दु:स्थिती पुरातत्व विभाग आणि प्राचीन स्थळे यांची झाली आहे, ती पुन्हा कधी न होता, भारताचा प्राचीन गौरवशाली वारसा, प्रगल्भ हिंदु संस्कृती यांचे दर्शन जगाला होऊ शकेल !

‘राणी’ मेल्याचे दु:ख आहे; पण…!

आमच्याकडे एक आदिवासी महिला, मागासवर्गीय किंवा मुसलमानही राष्ट्रपती होऊ शकतात. त्यामुळे वंशवाद किंवा भेदभाव आमच्याकडे नाही; मात्र ब्रिटनमध्ये तो आहे, त्यामुळे राणीच्या निधनाचे उदात्तीकरण न करता भारतीय हिंदूंनी ब्रिटन आणि पर्यायाने पश्चिमी जगताचा या प्रश्नांवरून दुटप्पीपणा उघडा पाडायला हवा !

भ्रष्टाचाराची विविध रूपे !

नैतिक समाज स्वत: भ्रष्टाचार करणार नाही आणि ‘भ्रष्टाचार होणार नाही’, यासाठी सजग असेल. व्यक्तीच जर मुळात नैतिक असेल, तर ती भ्रष्टाचारही करणार नाही आणि योग्य तो करही प्रामाणिकपणे भरेल. त्यामुळे खर्‍या अर्थाने राष्ट्र संपन्न होईल !

बेंगळुरूच्या पूरस्थितीतून धडा घ्या !

‘सहस्रो वर्षे प्रदूषणमुक्त असलेली पृथ्वी विज्ञानाने केवळ १०० वर्षांत प्रदूषणग्रस्त करून प्राणीमात्रांचा विनाश जवळ आणला आहे.’ ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान यांत वेगाने प्रगती होत असतांनाही मनुष्य नैसर्गिक आपत्ती का रोखू शकत नाही ?’, याचे उत्तर विज्ञानाकडे आहे का ?

शैलजा आणि मॅगसेसे !

साम्यवादी शैलजा यांच्याविषयी सहानुभूती बाळगण्याचे काही कारण नाही. तत्त्वहीन, दिशाहीन अन् राष्ट्रघातकी विचारांना खतपाणी घालणारे पक्ष अन् त्यांचे नेते यांच्याविषयी राष्ट्रप्रेमींना कणव का असावी ? मॅगसेसे प्रकरणामुळे साम्यवाद्यांचा वैचारिक कोतेपणा पुन्हा एकदा जगासमोर आला एवढे मात्र खरे !